कोल्हापूर

एसटीची ‘नॉनस्टॉप’ तपपूर्ती!

CD

एसटीची ‘नॉनस्टॉप’ तपपूर्ती!
गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेरी; आगाराला मिळतेय सर्वाधिक उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : रस्त्याच्या कामामुळे प्रवासाला उशीर होऊ लागला. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीवरून गडहिंग्लज-कोल्हापूर ही नॉनस्टॉप (विना थांबा) बसफेरी सुरू झाली. प्रायोगिक तत्त्‍वावरील ही फेरी पुढे कायमस्वरूपी झाली. उद्या (ता. ११) या बसफेरीची तपपूर्ती होत आहे. या बसफेरीतून गडहिंग्लज आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.
नोकरी, व्यवसाय, शासकीय कामानिमित्त गडहिंग्लजहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीसाठी येथील आगाराने गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या बसफेऱ्या निपाणी, कागलमधून जात होत्या. त्यामुळे प्रवासाला अधिक वेळ लागत होता. त्यातच २०११ मध्ये रस्त्याचे काम सुरू झाले. परिणामी, त्यामध्ये भरच पडली. प्रवासासाठी तब्बल सव्वादोन ते अडीच तास लागू लागले. या वेळी प्रवाशांनी नॉनस्टॉप फेरीची मागणी केली. आगारानेही प्रायोगिक तत्त्‍वावर एक फेरी सुरू केली.
नॉनस्टॉपमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होऊ लागली. त्यामुळे प्रवाशांकडून फेरींची संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला. कोल्हापूरला जाईन तर नॉनस्टॉपनेच जाईन अशी त्यांची भूमिका होती. आगारानेही टप्प्याटप्प्याने फेरींची संख्या वाढवत नेली. सध्या दर अर्ध्या तासाला नॉनस्टॉप फेरी आहे. आता तर ती विना वाहक धावते आहे. त्यामुळे वाहकांच्या पगारावर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे. गडहिंग्लज आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारी फेरी म्हणून गडहिंग्लज-कोल्हापूर नॉनस्टॉप फेरीकडे पाहिले जाते. या फेरीचा आगाराला मोठा आर्थिक आधार आहे. गडहिंग्लज-कोल्हापूर या नॉनस्टॉप फेरी उद्या बारा वर्षे पूर्ण करीत आहे.
-----------------
* अन्य आगाराकडून अनुकरण
एसटी महामंडळाने गडहिंग्लज-कोल्हापूर नॉनस्टॉप बसफेरीचा कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच उपक्रम राबवला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अन्य आगारांनीही त्याचे अनुकरण केले. इचलकरंजी, राधानगरी, गारगोटी आगारानेही आपापल्या मार्गावर नॉनस्टॉप बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT