कोल्हापूर

घरातून २० लाखांची चोरी

CD

KOP23L94979
कोल्हापूर ः राजारामपुरीमधील मंडलिक पार्कमधील बंगला क्रमांक एकमध्ये शनिवार मध्यरात्री चोरट्यांनी तिजोरी फोडली व ड्रॉवर उचकटून त्यातील रोकड व सोन्याचे दागिने चोरले.

वाढावा फोटो
KOP23L94978
कोल्हापूर ः मंडलिक पार्कमधील बंगल्यामध्ये चोरट्यांनी तिजोरी हिच तिजोरी फोडून साहित्य विसकटून टाकले होते.

घर फोडून १४ लाखांचा ऐवज चोरीस
मंडलिक पार्कमध्ये प्रकार; कुटुंब झोपेत असताना चोरट्यांचे कृत्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः संपूर्ण कुटुंब पहिल्या मजल्यावर झोपले असताना त्या खालील हॉलमधील लोखंडी तिजोरी फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे चौदा लाखांवर ऐवज चोरून नेला. मंडलिक पार्क येथील पुष्कराज प्रदीप सोनार यांच्या घरात शनिवार मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राजारामपुरी तेराव्या गल्लीतील मंडलिक पार्कमधील बंगला क्रमांक एकमध्ये पुष्कराज सोनार आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहतात. त्यांचे वडील जिल्हा माहिती कार्यालयातून छायाचित्रकार म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महालक्ष्मी चेंबरमध्ये फोटो लॅब आहे. ते, शनिवारी (ता. ८) सायंकाळी आठच्या सुमारास घरी आले. दुमजली बंगल्यात खाली हॉल, किचन आहे. तेथेच लोखंडी तिजोरी आहे. त्यामध्ये सर्व दागिने आणि लॅबमधील दैनंदिन रक्कम असते. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम आहेत. सर्वजण झोपण्यासाठी रात्री बेडरूममध्ये जाताना मुख्य दरवाजांना कुलूप लावतात. शनिवारीसुद्धा त्यांनी कुलूप लावले होते. मात्र सकाळी सहा वाजता त्यांची आई आशादेवी खाली आल्यानंतर त्यांना घरी चोरी झाल्याचे दिसून आले.
फिर्यादी पुष्कराज यांनी पोलिसांच्या टोल फ्री शंभर क्रमांकावर संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला; तेव्हा दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने ठसे तज्ज्ञ आणि श्‍वान पथकाला पाचारण केले होते. पोलिस अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली. चोरटे सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, या चोरीची माहिती माहिती प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला.

चोरीस गेलेला ऐवज...
रोख रक्कम - साडेतीन लाख रुपये
६० ग्रॅमच्या पाटल्या
४० ग्रॅमचा सोन्याचा तीन पदरी हार
५० ग्रॅमचे मंगळसूत्र
१५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस
१० ग्रॅमच्या अंगठ्या आणि कर्णफुले


सीसीटीव्हीसह संगणक नेला
बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; मात्र चोरट्यांनी ते मध्यरात्री एक वाजून ३२ मिनिटांनी बंद केले होते. याचबरोबर चोरट्यांनी
सीसीटीव्हीसह सीपीयुसुद्धा सोबत नेला. त्यामुळे चोरट्यांचे कोणतेही फुटेज हाती लागले नाही. चोरट्यांनी अंगणात शौच केल्याचेही दिसून आले. श्‍वान पथकाची दिशाभूल करण्यासाठी असे कृत्य केल्याचाही संशय फिर्यादी पुष्कराज यांनी व्यक्त केला आहे.

ना श्वान भुंकले
पहिल्या मजल्यावर सर्व कुटुंबीय झोपले होते. चोरट्यांनी खालच्या हॉलमधील लोखंडी कपाट फोडून चोरी केली. त्यावेळी कुटुंबातील कुणालाही जाग आली नाही. दररोज त्याच रस्त्यावर चार-पाच श्‍वान भुंकत असताना त्या रात्री एकही श्‍वान भुंकले नसल्याचे फिर्यादी पुष्कराज यांनी सांगितले. त्यामुळे श्वानांना बेशुद्ध करण्यासाठी काही फवारणी केली होती की काय असाही संशय बळावल्याचेही पुष्कराज यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT