96128
कोल्हापूर : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थीनींना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर भर
मत्री चंद्रकांत पाटील; १०१ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : महिला सक्षमीकरणासाठी मुलींना दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुलींना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून दर्जेदार शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर राज्य शासनाकडून भर दिला जात आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतददा पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना आरबीएल बँकेनेतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत (उमीद १०००) १०१ सायकल व शालेय वस्तूंच्या किटचे वितरण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनिषा देसाई, अरुण जाधव, ‘आरबीएल’चे मार्केटिंग व सर्व्हिस प्रमुख अभिजीत सोमवंशी, शासकीय सेवा विभाग प्रमुख पारुल सरिन, प्रकाश गुप्ता, दुर्गादास रेगे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘आरबीएल बँकेतर्फे विद्यार्थिनींना सायकल वितरण केल्यामुळे ग्रामीण भागात लांबच्या अंतरावरुन शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींची निश्चितच व्यवस्था होईल. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे. राज्य शासनातर्फे मुलगी जन्मल्यानंतर आर्थिक ठेव, ७५ वर्षावरील ज्येष्ठांना एसटी बसमधून मोफत प्रवास, महिलांना एसटी बसमध्ये निम्म्या भाड्यामध्ये प्रवास, उज्ज्वला गॅस योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून महिला व बालक, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय तसेच मराठा समाजातील तरुण तरुणींसह विविध घटकांचा विकास साधला जात आहे.’’
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, ‘‘शिक्षण ही मुलींच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दूरच्या अंतरावरुन शाळेत चालत जाणाऱ्या मुलींची सायकलमुळे गैरसोय दूर होईल. विद्यार्थिनींना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देवून मुलींची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.