कोल्हापूर

२०० पाणी योजनांचे झाले ऑडिट

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

२०० पाणी योजनांचे झाले ऑडिट

अहवालाचे विश्‍‍लेषण सुरु


कोल्‍हापूर, ता.२२: जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्‍ह्यात जल जीवन मिशनचे काम सुरु आहे. गावागावात पाणी योजना सुरु झाल्या आहेत. जिल्‍ह्यातील १०२५ गावे व वाड्या वस्‍त्यात १ हजार २३४ पाणी योजनांचे काम सुरु आहे. यातील २०० गावांचे त्रयस्‍थ यंत्रणेमार्फतऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिट अहवालांचे विश्‍‍लेषण विभागाकडून सुरु आहे.

जिल्‍ह्याच्या ग्रामीण भागात घरोघरी नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशनमधून पाणी योजना घेण्यात आल्या आहेत. यातील अनेक छोट्या योजना पूर्णत्‍वाच्या मार्गावर आहेत. या योजनांचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाल्या आहेत का, कामाची गुणवत्ता योग्य आहे का, हे तपासण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने त्रयस्‍थ यंत्रणेमार्फत तपासणी सुरु केली आहे. आजअखेर २०० पाणी योजनांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीचे अहवाल, योजनांतील त्रुटींची माहिती पाणी पुरवठा विभागाडे सादर करण्यात आली आहे.

योजनेच्‍या रक्‍कमेवर तपासणीचे टप्‍पे ठरवण्यात आले आहेत. ५० लाखांची योजना असेल तर एकदाच तपासणी करण्यात येते. तर ५० लाख पेक्षा अधिक रक्‍कमेची योजना असेल तर त्या पटीत तपासणी करण्यात येते. पहिला तपासणी अहवाल आल्यानंतर त्यातील त्रुटींची पूर्तता दुसऱ्या‍ तपासणीपूर्वी करणे आवश्यक आहे. जर कंत्राटदारांनी दुरुस्‍ती केली नसेल तर त्याप्रमाणात दंड व कारवाई करण्याचे अधिकारी पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत. सध्या पाणी योजनांच्या ज्या त्रुटी काढण्यात आल्या आहेत, त्यांची त्रुटी पूर्तता सुरु आहे. याबाबत कंत्राटदारांनी हयगय केल्यास कारवाई करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT