कोल्हापूर

रमजान ईद

CD

97805
आम्ही शिवबाचे मावळे...
कोल्हापूर ः छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरेप्रमाणे होणारी शिवजयंती आणि मुस्लीम बांधवांची रमजान ईद शनिवारी एकाच दिवशी साजरी झाली. ‘आम्ही शिवबाचे मावळे‘ असे अभिमानाने सांगत उत्सवात असे सेल्फी सेलीब्रेशन रंगले. (बी.डी.चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

97804
कोल्हापूर ः रमजान ईदनिमित्त मुस्लीम बोर्डिंगच्या मैदानावर सामूहिक नमाजपठण झाले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता व विश्‍वशांतीसाठी दुआ मागण्यात आली.

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात
राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रार्थना; मुस्लीम बोर्डिंगच्या मैदानावर सामूहिक नमाजपठण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान पर्वाची आज रमजान ईदने सांगता झाली. मुस्लीम बोर्डिंगच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाजपठण झाले. राष्ट्रीय एकात्मता आणि विश्‍वशांतीसाठी यावेळी दुआ मागण्यात आली. मुस्लीम बोर्डिंग मैदानावर मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हाफीज आकिब म्हालदार, मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनीही नमाज पठण केले. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत गरजूंना विविध मदतीचे वाटपही झाले.
आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी स्वागत केले. चेअरमन गणी आजरेकर यांनी आभार मानले. संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास, पापाभाई बागवान, लियाकत मुजावर, जहॉंगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताप झांजी, मलिक बागवान आदींच्या हस्ते खिरीचे वाटप झाले. दरम्यान, मुस्लीम पंचायतीच्या वतीने तिरंगा महल येथे ईद साजरी झाली.
--------------
गडहिंग्लजमध्ये गरजूंना मदत
गडहिंग्लज : गेला महिनाभर सुरु असलेल्या पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे पर्व आज ईदने साजरा करण्यात आले. पारंपारिक उत्साहात रमजान ईद शहर परिसरासह तालुक्यात साजरी करण्यात आली. ईद निमित्य जकातच्या माध्यमातून गरजूंना मदत देण्यात आली. सकाळी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणात विश्वशांतीसाठी प्रार्थना झाली.
----------------
इचलकरंजीत शांततेसाठी दुवा
इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी जागतिक शांततेसाठी व सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधीक्षक रामेश्‍वर वैंजणे आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT