कोल्हापूर

सीपीआर अर्भक

CD

‘ती’ दोन अर्भके बाहेरून आणलेली

अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित ः चौकशी समिती गठीत, सोमवारी अहवाल होणार जाहीर

कोल्हापूर, ता.२२ ः छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आढळून आलेली दोन मृत अर्भके ही बाहेरून आणून टाकल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. याला राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे. अर्भकाच्या हातात असलेला बॅण्ड आणि एक हॅण्डग्लोज मिळाले असून ते खासगी रुग्णालयातील असण्याची शक्यता आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, अर्भके प्रकरणी सीपीआर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल सोमवारी (ता.२४) जाहीर केला जाणार आहे. त्यातून ही अर्भके नेमकी कोठून आली हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
डॉ. दीक्षित म्हणाले की,‘ सीपीआरमध्ये आढळून आलेल्या अर्भक प्रकरणात प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. पण तूर्त मिळालेल्या माहितीनुसार ही अर्भके बाहेरून आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण सीपीआरमध्ये मृत झालेल्या अर्भकाची नोंद होते. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाला द्यावी लागते. त्याची नोंद घेतली जाते. त्यानंतर गर्भवती महिलेला डिस्चार्ज दिला जातो. या नोंदी तपासल्या आहेत. त्यामुळे ही अर्भके सीपीआरमधील नसल्याचे स्पष्ट होते. सीपीआरमध्ये मृत झालेल्या अर्भकाची नोंद होतेच, त्या सोबत अनावश्‍यक गर्भधारणेतील अर्भक असल्यास आणि त्याचा मृत्यू झाला असल्यास काळजी घेवून अधिकृत वैद्यकीय कचरा संकलन प्रशासनाकडे दिले जाते. याचीही नोंद ठेवली जाते. तसेच अर्भकाच्या हातात एका रुग्णालयाचा पट्टा आहे. तसेच एक हॅण्डग्लोजही दिसून आले आहे. मात्र ते नेमके कोठून आले आहे, याचा तपास सुरू आहे.
----
सीसीटीव्हीचे फुटेज तपासले

ती अर्भके ही सीपीआरमधील आहे की बाहेरची आहेत. याचा तपास पोलिसांसह सीपीआर प्रशासनाकडून सुरू आहे. सीपीआर प्रशासनाने तेथील सीसीटीव्हीचे फुटेजही पाहिले आहे. त्यामध्ये बाहेरून एखादी व्यक्ती आल्याचे दिसते. मात्र ती कोण आहे, त्यानेच ही अर्भके टाकली आहेत का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्याचाही तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT