कोल्हापूर

बार असो. देसाई पॅनेल विजयी

CD

99479जल्लोष
विजयी उमेदवार - 99483,99481,99477
-----------------------------------
जिल्हा बार असोसिएशन निवडणूक - लोगो
....


ॲड. प्रशांत देसाई पॅनेलचा एकतर्फी विजय

देसाई पॅनेलला १४ तर विरोधी ॲड. सर्जेराव खोत पॅनेलला एक जागा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २९ ः जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत आज ॲड. प्रशांत देसाई यांच्या पॅनेलने १५ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी विरोधी असलेले ॲड. सर्जेराव खोत यांचा केवळ ४४ मतांनी निसटता पराभव झाला असून त्यांना कार्यकारिणीत एक जागा मिळली. देसाई यांना १०८९ तर खोत यांना १०४५ मते मिळाली.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत न्याय संकुलातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये तीन केंद्रांवर २८ बूथद्वारे मतदान झाले. एकूण २८३५ मतदारांपैकी २१५४ मतदारांनी हक्क बजावल्यामुळे ७६ टक्के मतदान झाले. सायंकाळी सहाला अकरा टेबलवर ५० अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू झालेली मतमोजणी रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवराम जोशी यांनी काम पाहिले.
विजयी पॅनेलचा कल कळताच देसाई पॅनेलच्या उमेदवारांसह समर्थकांनी हलगी-ताशां‍च्या ठेक्यावर न्यायसंकुलात गुलालाची उधळण करून विजय साजरा केला. ‘जिद्द आहे, तळमळ आहे... म्हणून रिंगणात आहे,’ असा प्रचार करणारे ॲड. देसाई यापूर्वी दोन वेळा अध्यक्षपदासाठी पराभूत झाले होते. बहुतांश माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांच्या नेतृत्वाखाली देसाई पॅनेलने निवडणूक लढवली. ॲड.देसाई आज विजयी झाल्यानंतर न्याय संकुलात आले तेंव्हा जल्लोष पाहून त्यांचे डोळे पाणावले. सहकाऱ्यांच्या मिठीत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अध्यक्षपदासाठीचे विरोधी उमेदवार ॲड.खोत यांच्या आईचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळेही त्यांच्या प्रचारावर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र त्यांनीही कडवी झुंज दिली. माजी अध्यक्षांची आणि ज्येष्ठांनी ॲड. देसाईंसाठी बांधलेली मोट शेवटपर्यंत कायम राहिल्यामुळे हा विजय झाल्याचे निकालावरून दिसून आले.
-------------
ज्यांनी यापूर्वी पराभूत केले, तेही प्रचारात

ज्यांनी यापूर्वी देसाई यांना पराभूत केले होते. तेही आज देसाईंच्या प्रचारात आणि विजयाच्या जल्लोषात पुढे होते. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या देसाई यांना आपल्या पॅनेलमध्ये घेवून अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे नव्या-जुन्या वकिलांसह आता नवी कार्यकारिणी तयार झाली आहे.
-------------
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते आणि मताधिक्य असे -

अध्यक्ष - ॲड. प्रशांत देसाई - १०८९ - ४४
उपाध्यक्ष - ॲड. विजयसिंह पाटील - १२१० - २८७
सचिव - ॲड. तेजगोंडा पाटील - १४३५ - ७३८
सहसचिव - ॲड. जगजित आडनाईक -१२२० -३०२
लोकक ऑडिटर -ॲड. नवतेज देसाई - १३२१ - ५१५
महिला प्रतिनिधी - ॲड. अश्‍विनी भोसले -१३४६ - ५६६
कार्यकारिणी सदस्य - विजयी असे
विद्या संजय निकम - ११७३
बेन्झील एस.जमादार - ११४९
कुणाल रमेश नलवडे - १११४
ऋषीकेश मोहन काकडे - १०८९
अनिसा अ. शेख - १०८६
ओंकार अर्जुन पाटील - १०८०
विशाल दिनकर धनवडे -१०६८
विनायक दत्तात्रय म्हांगोरे - १०३९
सौरभ संजय सरनाईक ११२१ (ॲड. सर्जेराव खोत पॅनेल)
---------------------------

‘खंडपीठ हा अजेंड्यावरील मुद्दा आहे. तो पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना भेटणार आहे. ज्युनिअर वकिलांचेही प्रश्‍न सोडवायचे आहेत. माझी काम करण्याची तळमळ पाहून माजी अध्यक्षांसह सर्वांनी केलेल्या सहकाऱ्यांमुळे हा विजय झाला आहे. हा विजय मतदारांचा आहे.
ॲड. प्रशांत देसाई, नूतन अध्यक्ष
-----------

फेरमोजणी नाही...

अध्यक्षपदासाठी फेर मतमोजणी घेण्याचा प्रस्ताव विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला. मात्र तब्बल ४४ मतांचा फरक असल्यामुळे फेर मतमोजणी घेणे शक्य नसल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम जोशी यांनी निकाल जाहीर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT