कोल्हापूर

-सिंधुदुर्गाला मान्सूनची चाहूल

CD

06416
सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गुरुवारी नभ दाटून आले होते.

सिंधुदुर्गात मॉन्सूनची चाहूल
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १ः मॉन्सूनच्या आगमनासाठी अरबी समुद्रातील पोषक वातावरण असताना आज जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी (ता. ३१) रात्री वैभववाडीसह जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात नऊपर्यत मॉन्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. अरबी समुद्रात मॉन्सून आगमनास पोषक वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. एकीकडे मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असताना जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. काल दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रात्री उशिरा वैभववाडी तालुक्यातील सोनाळी, कुसूर, भुईबावडा, कुंभवडे, मांगवली परिसरामध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यानंतर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातील काही भागात देखील सरी कोसळल्या. घाटपायथ्याच्या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. काही गावांमध्ये पहाटे देखील सरी कोसळल्या.
जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले होते. काही भागात पावसाचा छिडकावा देखील झाला. सायंकाळी कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी शक्यता होती.

सिंधुदुर्गात नऊपर्यत येणार
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण आहे. त्यामुळे मॉन्सूनचे केरळमध्ये चार ते पाच जूनपर्यत तर महाराष्ट्रात १० जूनपर्यत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र, सिंधुदुर्गात ९ जूनपर्यत मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे.
खरीप हंगामाची लगबग
मॉन्सूनच्या संभाव्य आगमनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. भात बियाणी, खते खरेदीस शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. याशिवाय भाजीपाला बियाणे खरेदीकडे देखील शेतकऱ्यांना कल दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT