कोल्हापूर

पळापळी, तणाव

CD

घबराट, पळापळी आणि तणाव
शहराने अनुभवले वातावरण ः दुकाने बंद, रस्त्यावर सामसूम, पर्यटकांचेही हाल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः अचानक जमलेला जमाव, त्यांच्याकडून परिसरात सुरू असलेली शोधमोहीम, त्यांच्या मागे धावणारे पोलिस आणि हा सर्व प्रकार बघत घाबरून पळणारे नागरिक आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव असे अभुतपूर्व वातावरण आज शहरातील लक्ष्मीपुरी, दसरा चौक आणि सीपीआर चौकासारख्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या परिसराने अभुनवले.
मोबाईलवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दुपारी दोन वाजता निर्माण झालेल्या या वातारणामुळे शहराच्या मध्यवर्ती परिसरातील दुकानेही काही काळ बंद झाली. तब्बल चार तासांनी तणाव कमी झाला. पण, त्याची धग कायम होती. परिणामी या परिसरातील दुकानांसह अपवाद वगळता इतर व्यवसाय उशारीपर्यंत बंदच राहिले.
दुपारी दोनच्या सुमाराह आक्षेपार्ह पोस्टचा विषय पुढे आला. त्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर धाव घेतली. वाऱ्यासारखी ही बातमी कोल्हापुरात समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी केली. व्हायरल स्टेटस भाऊसिंगजी रोडवरून आल्याचे समजताच या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा त्या परिसराकडे वळवला. तेथून हे कार्यकर्ते सिध्दार्थनगर परिसरात आले आणि पुढे हा मोठा जमाव होऊन तो दसरा चौकात आला. पुढे जमाव आणि त्याच्या मागे लाठी घेऊन धावणारे हेल्मेटधारी पोलिस असे वातावरण पहायला मिळाले.
दसरा चौकात या जमावाने एका तरूणाला माराहाण केल्याने एकच धावपळ उडाली. या परिसरातील हातगाड्यासह व्यवहार बंद झाले. लोक सैरावैरा पळू लागले. त्यात अनेकजण खाली पडले, काहींची चप्पलेही त्याच परिसरात पडली. पोलिसांना हा जमाव पांगवल्यानंतर हेच कार्यकर्ते पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर एकत्र आले.
या प्रकाराची माहिती मिळताच सीपीआर ते महापालिका, लक्ष्मीपुरी आणि दसरा चौकातील दुकाने पटापपट बंद झाली. दुकानदार दारातच थांबून झालेला प्रकार बघत राहिले तर अन्य कामासाठी आलेल्या नागरिकांनी रस्त दिसेल त्यादिशेने धाव घेऊन या दंग्यापासून स्वःतचा बचावा केला. या प्रकाराने या चौकातील वाहतूकही काही काळ खोळंबली.

चौकट
पर्यटकांचे हाल
उन्हाळी सुटीमुळे शहर आणि परिसरात अन्य जिल्ह्यातील पर्यटकांची मोठी गर्दी आजही होती. घडलेल्या घटनेचे पडसादही लक्ष्मीपुरी, दसरा चौक, सीपीआर परिसरात उमटले. याच परिसरातून अंबाबाई मंदिर, जोतिबा व पन्हाळ्याकडे वाहनातून चाललेले पर्यंटक सैरभर झाले. रस्त्यावर गर्दी आणि त्यातून मार्ग काढताना त्यांना कसरत करावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT