कोल्हापूर

सरुड…नागपूर-कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गाचे

CD

‘लोगोमध्ये रस्त्याचे चित्र टाकणे)


लोगो
ऐतिहासिक कोल्हापूर-रत्नागिरी
आंतरराष्ट्रीय मार्गः भाग १
़-
मालिका लीड
नागपूर-कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. तसा हा पूर्वीचा कोल्हापूर-रत्नागिरी व कोल्हापूर-राजापूर असा आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. कोल्हापूर शहराशी युरोप आणि मध्य आशियाचे व्यापारी संबंध खुप जुने आहेत. याचे पुरावे आजही प्राचिन वस्तू, वास्तू आणि वनस्पतीच्या रुपाने पहायला मिळतात. याच मार्गाचे काळाच्या ओघात झालेले बदल आणि गरज यांचा धांडोळा घेताना सध्याचा कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अपुरा आणि गैरसोईचा ठरल्याचे ठसठशीत चित्र पुढे येते. या मार्गामधील इतिहास आणि वर्तमान याची सांगड घालून लिहलेली मालिका आजपासून...
-

कोल्हापूरातून आशियायी, युरोपसोबत व्यापार
आंतरराष्ट्रीय मार्ग बनला हम रस्ता ः रत्नागिरी, राजापूर बंदरातून दळणवळण

डी. आर. पाटील: सकाळ वृत्तसेवा
सरूड, ता. १८ ः इ.स.पूर्व २०० ते इ.स.२०० या कालखंडात कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग व्यापारी दृष्ट्या वैभावाचा कालखंड होता. कोल्हापूर शहरातून रत्नागिरी आणि राजापूर बंदरामार्गे मध्य आशियायी व युरोपियन देशांबरोबर या मार्गावरून व्यापार चालायचा. एका अर्थाने तेव्हा हा रस्ता आंतरराष्ट्रीय महामार्ग होता. मात्र आज हा हम रस्ता जिवघेणा बनला आहे.

कोल्हापूर आणि रोम या देशांचे संबंध खूप जुने आहेत. कोल्हापूर, रोम, इटली, इजिप्त यांच्यामध्ये कोल्हापूर ते अनुस्कुरामार्गे राजापूर व कोल्हापूर ते आंबा घाट मार्गे रत्नागिरी या मार्गावरून सातत्याने व्यापारानिमित्ताने दळणवळण व्हायचे. १८४५ मध्ये कोल्हापूर संस्थान ब्रिटिशांच्या रेसिडेन्सीखाली आल्यानंतर रस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली.
ब्रिटीशांनी वाहतूक गतीने व्हावी म्हणून रस्ते दळण वळणावर लक्ष केंदित केले होते. याचाच भाग म्हणून १८५७ मध्ये रोडमॅपींग केले, खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. तेव्हा दळणवळण मर्यादित होते. आज या मार्गावरून हजारो वाहने रोज धावतात, वाहनांची गर्दीच मोठा अडथळा बनली आहे. यातूनच अपघात वाढले आहेत

कधी, काय झाले?
*१८४५ ते १८५४
- कोल्हापूर संस्थानात रस्ते ः ४८० कि.मी.लांबीचे रस्ते ब्रिटीशांनी बनवले

*१८५८
ः- कच्च्या रस्त्यावर पोलिस चौक्या ः वाघबीळ, बोरपाडळे, बांबवडे, मलकापूर व आंबा

*१८८१ ते १८८३
- कोल्हापूर ते आबा नवा रस्ता ः खर्च ४,८२,३४० रुपये
- आबा घाटातील रस्ता दुरुस्त ः खर्च १,५०,२०० रुपये

चौकट
सोयीचा कमी, गैरसोयीचा अधिक
गेल्या ६० वर्षापासून हा मार्ग दोन पदरीच असल्याने वाहतुकीला शिस्त नाही. रस्त्याच्या सोयीमुळे वेळेची बचत होण्याऐवजी रस्त्यावरल वाहनांच्या गर्दीमुळे कोल्हापूरला पोहोचण्यास प्रचंड वेळ लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा रस्ता सोयीचा बनण्याऐवजी गैरसोयींचाच अधिक बनला आहे.

कोट
सातवाहन, चालुक्य, शिलाहार, शिवकाळ व ब्रिटीश कालखंडात मोठ्याप्रमाणात येथून वाहतूक चालायची. याच्या ऐतिहासिक पाऊलखुणा आजही सापडतात. कोल्हापूरच्या रस्ते बांधणीत कर्नल कर्नल अंडरस, कर्नल स्नायडर, कर्नल पार, कर्नल रिव्ह यांचे मोठे योगदान आहे.
- सुहास नाईक, इतिहास अभ्यासक व संशोधक, सरुड-पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT