कोल्हापूर

शेंद्री रोड, औरनाळमार्गे माद्याळ बसफेरीची मागणी

CD

शेंद्री रोड, औरनाळमार्गे
माद्याळ बसफेरीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : माद्याळ कसबा नूल या गावासाठी सध्या दुंडगेमार्गे बसफेऱ्या आहेत. मात्र आयटीआय, रेडेकर हॉस्पीटल आणि विविध शाळांना जाण्यासाठी विद्यार्थी, प्रवासी व रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे शेंद्री रोडवरील आयटीआय, औरनाळमार्गे माद्याळसाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सध्या दुंडगेमार्गे सुरू असलेल्या बसफेरीला दुंडगे, माद्याळ या दोन गावाचेच प्रवासी मिळतात. आर्थिक उत्पन्नाचा विचार केला तर शेंद्री रोडने आयटीआय, रेडेकर हॉस्पीटल, औरनाळ, माद्याळ, हनिमनाळपर्यंत बसफेरी सुरु करणे आगारालाही सोयीचे ठरणारे आहे. बसफेरीच्या या मार्गावर प्रवाशांचे भारमानही चांगले मिळू शकते. किंबहुना आगाराचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. रेडेकर हॉस्पीटलकडे जाणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. आयटीआय, साधना माळावरील महाविद्यालय, न्यू हॉरीझन स्कूल, औरनाळ हायस्कूल अशा संस्था असल्याने प्रवाशीसंख्या मिळू शकते. दुसरीकडे विद्यार्थ्यांचीही सोय होवू शकते. दरम्यान, ग्रामपंचायतीने गडहिंग्लज-निपाणी-कोल्हापूर जाणारी बससेवा साधनामाळ, औरनाळ, माद्याळ नवीन वसाहत, हनिमनाळ, भैरापूरमार्गे सुरु करण्याची मागणी केली आहे. माद्याळच्या जागृत सोमलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी कर्नाटकातीलही भाविक मोठ्या संख्येने येतात. या फेरीमुळे विद्यार्थी, भाविकांची सोय होणार आहे. मलगोंडा पाटील यांनीही निपाणी व गडहिंग्लज आगाराला नवी बसफेरी सुरु करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. आगार प्रमुखांनी या दोन्ही मार्गांचा सर्व्हे करुन तातडीने बसफेरी सुरू करावी, अशी मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT