13016
कोल्हापूर : नंदवाळच्या वारीतील भक्तांना फराळाचे वाटप करताना यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) सदस्य.
यिन सदस्यांतर्फे
फराळाचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेला वारकरी...खांद्यावर भगवा झेंडा अन् मुखी ‘ज्ञानोबा, माऊली,’चा जयघोष...वारीच्या मार्गावर विठ्ठलभक्तांची जणू मांदियाळी...यिन सदस्यांची त्यांना फराळ देण्यासाठी धडपड...एक, दोन नव्हे तर हजारो भक्तांनी त्याचा लाभ उठवला अन् यिन सदस्यांना वारीतील भक्तीचा प्रत्यय आला. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील वारकरी दिंडीत फराळ वाटपाचा उपक्रम झाला. सुमारे पाच तास वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
नंदवाळ वारीत वारकऱ्यांचा सहभाग दरवर्षी वाढत आहे. नंदवाळच्या पंचक्रोशीसह अन्य तालुक्यातून दिंड्या घेऊन वारकरी येथे येत आहेत. पायी येणाऱ्या वारकऱ्यांचा दिंडीतील उत्साह कायम ठेवण्यासाठी यिनच्या सदस्यांनी त्यांना फराळ वाटप करण्याचे ठरवले होते. त्यानुसार ते दुपारी पुईखडी, वाशीतील मार्गावर थांबले होते. पुईखडीची नागमोडी वळणे पार करून आलेल्या वारकऱ्यांना त्यांनी लाडू, केळी, पाण्याच्या बाटल्या दिल्या. काही सदस्य वाशीच्या कमानीसमोर फराळ वाटत होते.
यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, मानसिंग निकम, प्रसाद खवरे, आदित्य देसाई, ओंकार रसाळ, हर्षवर्धन देवकर, सूर्याजी सरनाईक, तृप्ती उणे, अथर्व चौगुले, श्रेया चौगुले, शिवानंद पोळ, सुरेखा कांबळे, विनायक पाटील, वैष्णवी गुजर, तेजस पाटील, निशांत कोळी, श्रृती भोसले, मोहन मोरे, शर्वरी पाटील, प्रणव अतिग्रे, सौरभ फेगडे, तानिया मुरसल, संकेत पोवार, स्नेहल परीट, चेतना रांगी, दुर्वा सावंत, शिल्पा साळुंखे, तिर्था मोळे, साक्षी जानकर, ऋषीकेश कांबळे, यशराज पोळ, कीर्तिवर्धन पाटील, अभिषेक आंबोळे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
---------------
कोट
वारकरी पंढरीच्या वारीत का सहभागी होतो, याचा उलगडा नंदवाळच्या वारीत झाला. विठ्ठल नामाच्या गजरात त्यांच्यात येणारी ऊर्जा जगण्याला बळ देते. त्यांच्या या उत्साहात फराळ वाटपाची सेवा करून आम्हाला आनंद घेता आला.
- राजलक्ष्मी कदम, जिल्हा कार्याध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.