rates of green chilly are fall down from 7 thousand to 1500 rupees  
कोल्हापूर

Green Chilli Price Rise:हिरव्या मिरचीची सेंच्यूरी, तर टॉमॅटोचा भावही वधारला

Green Chilli prised at hundredमिरचीचा किलोचा दर दुपटीने वाढत किलोला १२० रुपयावर पोहोचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज येथील आठवडा बाजारात मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने हिरव्या मिरचीचा ठसका वाढला आहे. मिरचीचा किलोचा दर दुपटीने वाढत किलोला १२० रुपयावर पोहोचला आहे. टोमॅटोचा दरही वधारला आहे. तुलनेत गेले काही महिने तेजीत असणाऱ्या गवार, ढब्बू यांचे दर थोडे उतरले आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाल्याने फळभाज्या, मिरची रोपांना मागणी वाढली आहे.

जनावरांच्या बाजारात म्हैशींची आवक सुधारत आहे.
गेल्या महिनाभरापासून मंडईत हिरव्या मिरचीचा तुटवडा आहे. त्यामुळेच दराचा आलेख वाढत गेला. सरासरी उन्हाळ्यात ३०० ते ४०० रुपये असणारा दहा किलोचा दर ७५० रुपयावर झेपावला आहे. पाऊस लांबल्याने पाणी टंचाई होऊन उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, किळकोळ बाजारात किलोचा दर १०० ते १२० रुपयावर पोहोचला. लगतच्या कर्नाटक आणि चंडगड तालुक्यातून हिरव्या मिरचीची आवक होते.

नवी मिरची बाजारात येऊपर्यंत हा दर टिकून राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. आवक वाढू लागल्याने ढब्बू, गवार यांचे दर उतरत आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा दहा किलोमागे १०० रुपयांनी दर कमी झाला आहे. कारली, दोडका, वांगी यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दर वाढलेलेच आहेत. कोंथिबिरीचा दरही अधिक आहे. पालेभाज्या, कोंथबिर २५ ते ३० रुपये पेंढी आहेत. दहा किलोचे दर असे : कोबी १००, टोमॅटो, गवार ५००, कारली ४००, ढब्बू ४५०, दोडका ३०० रुपये.
फळबाजारात कर्नाटकातील तोतापुरीची आवक टिकून आहे. १५ ते २५ रुपयापर्यंत नगाचा दर आहे. परदेशी सफरचंद १२० ते १५० रुपये किलो आहेत. अननस २० ते ४० रुपये आकारानुसार दर आहे. पावसाला सुरवात झाल्याने गुणे पथवर फळभाज्यांच्या रोपांना मागणी दिसली. ब्याळकुड (ता. चिक्कोडी) येथून रोप विक्रेते आले होते.

टोमॅटो, हिरवी मिरची, प्लॉवर, वांगी यांच्या रोपांना मागणी होती. जातीनुसार रोपांच्या पेंढीचा दर २० ते ५० रुपयापर्यंत असल्याचे विक्रेते शंकर पाच्छापूरे यांनी सांगितले. पावसामुळे हिरव्या चाऱ्याची आशा वाढल्याने जनावरांच्या बाजारात म्हैशींची आवक सुधारत आहे. आज ५० हुन अधिक आवक नोंदली. ३० ते ८० हजारापर्यंत दर होते. शेळ्या मेंढ्याची ४० हुन अधिक आवक होऊन ६ ते १५ हजारापर्यंत दर होते.

भुईमुगाच्या शेंगाची आवक ओसरली
उन्हाळी भुईमुगाची ओल्या शेंगाची आवक यंदा एप्रिल महिन्यापासून सुरु झाली होती. मे मध्यानंतर ती सर्वाधिक राहिली. मागणीच्या तुलनेत खुपच कमी आवक असल्याने दर चढेच राहिले. किलोचा १०० ते १२० रुपये किलो असा दर होता. हंगाम संपत आल्याने हि आवक कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT