कोल्हापूर

लम्पीचे पुन्हा लसीकरण सुरु

CD

लम्पीचे पुन्हा लसीकरण सुरु
‘पशुसंवर्धन’ची खबरदारी; गडहिंग्लजला ५० टक्के लस उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : गतवर्षी लम्पी आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाला. गडहिंग्लज तालुक्यातही त्याचा शिरकाव झाला होता. सध्या बाधित जनावरे नसली तरी राधानगरी, करवीर तालुक्यात प्रादूर्भाव कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाने तालुक्यात पुन्हा लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के लस उपलब्ध झाली आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात लम्पीचा प्रादुर्भाव सुरु झाला. गडहिंग्लज तालुक्यात या आजाराचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. जनावरांची खरेदी-विक्री होणारे आठवडा बाजार बंद केला होता. बाधित जनावरांमुळे अन्य जनावरांना प्रादूर्भाव होण्याचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला होता. तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम हाती घेतली होती. तरीही गडहिंग्लज तालुक्यातील ३८२ गायवर्ग जनावरांना याची बाधा पोचली होती. उपचारानंतर यातून ३५५ जनावरे बरी झाली. पण, २७ जनावरांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव थांबला आहे. नवी बाधित जनावरे नाही. पण, राधानगरी व करवीर तालुक्यात अजूनही प्रादुर्भाव थांबलेला नाही. तसेच कोणताही साथीचा आजार आला की सलग तीन वर्षे लसीकरण मोहिम सुरुच ठेवली जाते. त्यामुळे खबरदारी म्हणून लम्पीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला प्रारंभ केला आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे गावनिहाय लसीकरणाचे नियोजन केले आहे.
----------
दृष्टीक्षेप
गायवर्ग जनावरे ः १८८०९
उपलब्ध लस ः ९२००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT