कोल्हापूर

गड-कोंकणी परिषद

CD

14763
गडहिंग्लज : अखिल भारतीय कोंकणी परिषद व उजवाड परिवारातर्फे झालेल्या कार्यक्रमात दामोदर मावजो यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जे. बी. बारदेस्कर, डॉ. भूषण भावे, ऑल्विन बरेटो, लुईस रॉड्रीक्स आदी उपस्थित होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----

कोंकणी शब्दकोष तयार व्हावा

दामोदर मावजो : गडहिंग्लजला कोंकणी परिषदेचा स्थापना दिवस

गडहिंग्लज, ता. ८ : ‘चार-पाचशे वर्षांपूर्वी अनेक कुटुंबे गोवा सोडून इतरत्र गेली. आपल्यासोबत ती संस्कृती, भाषा घेऊन गेली. कोंकणी भाषेतील जे शब्द इतरत्र गेले, त्याला त्या-त्या प्रांतात काय म्हटले जाते याचा शब्दकोष तयार झाला पाहिजे. मराठी, इंग्रजी भाषेचा शब्दकोष आहे. तसाच कोंकणी शब्दकोष तयार व्हावा’, अशी अपेक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय कोंकणी परिषद व उजवाड परिवारातर्फे परिषदेच्या ८४ व्या स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. मावजो बोलत होते. सिंधुदुर्ग प्रांताचे बिशप आल्वीन बरेटो, प्राचार्य डॉ. भूषण भावे, उजवाडचे संस्थापक लुईस रॉड्रीक्स यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. येथील चर्चच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मावजो म्हणाले,‘ देशात कोंकणी बोलणारे सुमारे ५० लाख लोक आहेत. गोव्यासह कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात ही भाषा बोलली जाते. सारे कोंकणी लोक एकविचार घेऊन पुढे जाऊया.’ श्री. बरेटो यांनी प्रांतानुसार भाषा कशी बदलत गेली याची माहिती दिली. डॉ. भावे यांचेही भाषण झाले.
दरम्यान, उदयबाब भेंब्रे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मेल्वीन रॉड्रीक्स यांनी तो स्वीकारला. जॉकी फर्नांडिस (आजरा), मोनिका आंतोन क्रुझ (कालकुंद्री), डॉ. अशोक फर्नांडिस (आजरा), डॉ. संजय शानभाग (गडहिंग्लज) यांना उजवाड गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिनिन गोन्साल्वीस यांनी स्वागत केले. मेल्वीन रॉड्रीक्स यांनी प्रास्ताविकात कोंकणी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. मंजुनाथ शानभाग, फिलॉन बार्देस्कर, वर्षा कुटिन्हो, डॉ. बेनिता डायस, हेलन मंतेरा यांनी गौरवपत्र व मानपत्राचे वाचन केले. ‘साधना’चे सचिव जे. बी. बारदेस्कर, पॅरिस प्रिस्ट, फादर आगस्तीन फर्नाडिस आदी यावेळी उपस्थित होते. कोंकणी परिषदेच्या सहसचिव माया स्वरंगटे यांनी आभार मानले. अरविंद बारदेस्कर, अतिष मिनिजिस, मिनिन डिसोझा, इनास कुटिन्हो, जोसेफ नरोन्हा, गिरगोल मिनिंजीस यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT