कोल्हापूर

गड- बैलजोडीला भाव

CD

फोटो क्रमांक : gad82.jpg
14832
गडहिंग्लज : विक्रमी भाव मिळालेली काशिनाथ बेळगुद्रीची बैलजोडी.
-----------------------------

बैलजोडीला मिळाला साडेसहा लाखांचा भाव

गडहिंग्लज, ता. ८ : येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ शंकर बेळगुद्री यांच्या सरपंच- आमदार बैलजोडीला विक्रमी भाव मिळाला. खिलार जातीच्या आठ वर्षीय बैलजोडीला विक्रमी साडेसहा लाख रुपयांचा भाव मिळाला. पुण्याचे पांडुरंग चौधऱी यांनी ही बैलजोडी खऱेदी केली. विक्रमी व्यवहार झालेली बैलजोडी पशुपालकांत कौतुकाचा विषय ठऱली आहे.
बेंदुरापासूनच श्री बेळगुद्री यांच्या बैलजोडीला मागणी वाढली होती. सीमाभागासह पुणे येथील अनेक हौशी पशुपालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन बैलजोडीसाठी उत्सुकता दाखवली होती. येथील सदृढ बैलजोडी स्पर्धेतही सरपंच-आमदार ही जोडी लक्षवेधी ठरली. रुबाबदार जोडीमुळेच बैलजोडीला सोन्याचा भाव आला. आठ वर्षीय खिलार जातीची ही बैलजोडी आहे. पुणे परिसरात बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी जातीवंत बैलजोडी प्रतिष्‍ठेची मानली जाते. बैल पोळ्यासाठीच चौधऱी कुटुंबीयानी बैलजोडीचा आज व्यवहार केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, भैरू डोमणे, अरविंद पाटील, अशोक शिंदे उपस्थित होते.
काळभैरी रोडवरील श्री बेळगुद्री यांना बालपणापासून जातीवंत जनावरे जोपासण्याचा छंद आहे. वडिलांकडून त्यांना हा वारसा लाभला. अलीकडे यांत्रिकीकरणातही त्यांनी शेतीकामासाठी बैलजोडी कायम ठेवली आहे. दूध व्यवसायासाठी त्यांनी जातीवंत गाई, म्हशींचेही संगोपन केले आहे. येथील लक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. घटप्रभा, बोरगलसह सीमाभागातील विविध प्रदर्शनांत त्यांच्या जनावरांना बक्षिसे मिळालेली आहेत. दूध उत्पादनातही त्यांच्या गाई, म्हशीं पुरस्कार मिळविले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT