कोल्हापूर

बाजारपेठेत फळे आवक घट

CD

फळांची आवक घटली
भाव तेजीत; पावसाळ्यामुळे हंगाम थंडवला
कोल्हापूर , ता. १५ ः पावसाळ्यामुळे फळांचा हंगाम थंडवला तशी आवक थंडावली. घाऊक बाजार पेठेत जेमतेम फळांची आवक होत आहे. स्थानिक पातळीवरही मागणी असून पुरेशा प्रमाणात फळांची आवक नसल्याने चढ्या भावात परदेशी फळे खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. येथील शाहू मार्केट यार्डात घाऊक बाजारात स्थानिक तसेच परप्रांतातून फळांची आवक होते रोज ६ ते १२ गाड्या फळे येतात मात्र यंदा जेमतेम एक-दोन गाड्याच फळांची आवक होते.
समितीत सफरचंद दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशातून येतात मात्र तेथे पाऊस, वादळ वारे व दिल्लीत यमुना नदीला आलेला पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सफरचंदाची आवक थंडवली आहे. नागपूर भागातही पाऊस वादळ वाऱ्यामुळे संत्र्याची काढणी झालेली नाही, परिणामी आवक कमी आहे. तर कोकणी आंब्याचा हंगाम नुकताच संपला आहे, पण बाजारपेठेत ग्राहकांकडून अजूनही आंबा खरेदी होत असल्याने कर्नाटक केरळमधून तोतापुरी आंबा किंवा आडसाली आंब्याची आवक सुरू आहे. मात्र त्याचे भाव तेजीत आहेत.
पावसाळी हंगामात अननसाची आवक मात्र दक्षिण भारताच्या विविध भागातून होत आहे. रोज एक ते दोन ट्रक माल येत असल्याने अनेक काहीसा भाव नियंत्रणात आहेत. हीच स्थिती डाळीबांची आहे. पंढरपूर, सांगोला, जुनोनी भागातून डाळींब आवक होत आहे.
------------
चौकट
ठराविक फळेच उपलब्ध
मुंबई पुण्यात परदेशी फळे खरेदी करणाऱ्या ४० ते ६० एजंट आहेत त्यांच्याकडे विदेशातून फळे येतात. उंची पॅकींगमधील फळे स्थानिक व्यापारी पूर्व नोंदणीकरून खरेदी करतात तोच माल सद्या कोल्हापूरात येत आहे. काही ठराविक फळ विक्रेत्यांकडे अशा परदेशी फळे मिळत आहेत यात पेरू, सफरचंद, माल्टा, किव्ही, खजूर अशा फळांचा समावेश आहे.
--------------
सफरचंद २५० ते ३०० रूपये किलो
मार्केट यार्डात सध्या कमीत कमी ४० ते ६० बॉक्स एवढीच बहुतेक फळांची आवक होत आहे. सफरचंद २५० ते ३०० रूपये किलो, संत्रा मोसंबी १५० ते २५० रूपये किलो तर पेरू १५० रूपये किलो आहेत. दक्षिणेतील आंबा १०० ते २४० रूपये किलो, डाळींब, अननस १०० रूपयांच्या आसपास आहेत. चिक्कूची फारशी आवक नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT