कोल्हापूर

जुलैमध्ये पहिली मशागत

CD

फोटो क्रमाक : gad185.jpg

17045
नूल : पावसाने उघडीप दिलेल्या कालावधीत सोयाबीन पिकामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी पहिली कोळपणी केली. (छायाचित्र : संजय धनगर)
--------------------------------------------------------
जुलैमध्ये झाली पहिली मशागत
उशिरा पेरण्यांचा परिणाम ; गडहिंग्लज भागात पाऊस वाढला

गडहिंग्लज, ता. १८ : तालुक्यातील बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन, भात, भुईमूग पिकामध्ये जुलैमध्ये पहिली मशागत झाली. उशिरा पेरण्या झाल्याचा हा परिणाम आहे. दरवर्षी या कालावधीपर्यंत दोन मशागती पूर्ण होत असत. यंदाचे चित्र मात्र वेगळे पहायला मिळत आहे. दरम्यान, गडहिंग्लज परिसरात आजपासून (ता. १८) पाऊस वाढल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे.
तालुक्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. यामध्ये अधिकाधिक सोयाबीन, त्यानंतर भात आणि भुईमुगाची लागवड होते. यावर्षी पाऊस लांबल्याने पेरण्याही खोळबंल्या. काही शेतकऱ्यांनी भाताच्या धूळवाफ पेरण्या केल्या. पाऊस नसल्याने पाणी देवून भाताला जगवले. सोयाबीनचीसुद्धा पाणी सोडूनच टोकणनी केली. पाऊस येईपर्यंत पाणी देवूनच हे पीकसुद्धा जगवण्याची धडपड सुरु होती. पाणी देवून पिके जगवलेल्या पिकांमध्ये दुसरी मशागत पूर्ण झाली आहे. परंतु, केवळ पावसावर अवलंबून असलेल्या बहुतांश क्षेत्रात मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या झाल्या. त्याची उगवण झाली आहे. या क्षेत्रातील पिकांमध्ये पहिली मशागत मध्यंतरी उघडीप दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी केली.
जुलै महिना अतिपावसाचा. परंतु पहिला पंधरावडा तुरळक पावसानेच गेला. दोन दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. या मुरवणीच्या पावसाने पिकांना संजीवनी ठरणार आहे. मशागत पूर्ण करुन भुईमूग, काही शेतकरी भाताला खतांचा डोसही दिला आहे. यामुळे या पावसाचा पिकांवरील परिणाम चांगला जाणवणार आहे. पिकाच्या वाढीला पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. आज दिवसभर पाऊस संततधार आहे. त्यातही शेतकऱ्यांनी शिवारातील कामे उरकून घेत होते. काही शेतकरी अजूनही भातातील मशागत करीत आहेत. त्यात आजच्या पावसाने व्यत्यही आला. त्यांना मशागतीसाठी उघडीपीची वाट पहावी लागणार आहे. तालुक्याच्या पश्‍चिम व दक्षिण भागात भात रोप लावणीला गती आली आहे. चिखलगुठ्ठ्यासाठी हा पाऊस चांगला झाल्याने रोपलावणीत शेतकरी मग्न आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT