कोल्हापूर

सतेज पाटील तारांकित प्रश्न

CD

शिक्षकांचे सातव्या वेतनचे
प्रलंबित हप्ते त्वरित आदा करा

सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते, सेवानिवृत्तीची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. पुरवणी मागणीद्वारे आवश्यक रकमेची मागणी केली असून, निधी उपलब्धतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची थकबाकी दिली जाईल, असे लेखी उत्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
इतर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता मिळाला असताना शिक्षक व शिक्षकेतर सातवा वेतनाचा फक्त पहिला व काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळाला आहे. थकबाकीचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासंदर्भात ९ व २४ मे रोजी शासन निर्णय निघाला आहे. मात्र, अजूनही दोन्ही हफ्ते देणे प्रलंबित आहेत, याकडे आमदार पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT