कोल्हापूर

जीएसटी चोरी उघड दोन अटक

CD

17051

जीएसटी भवानातून वायर चोरणाऱ्यांना अटक
दोघे परप्रांतीय; १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त, शाहूपुरी पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः ताराबाई पार्क येथील जीएसटी भवनात चोरी करणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्याने शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. हरेराम दशरथ विश्र्वकर्मा (वय २५, रा. ग्राम वरांगा पोस्ट सायदराजा जि. चंदोली, राज्य उत्तरप्रदेश) आणि गुलशन साहू (वय २४, रा.ठाकर दिया ठाण बिलाईगड, जि.बुलावदा हाजार, भाटापारा, राज्य छत्तीसगड) अशी त्यांची नावे आहेत. बनावट चावीने स्टोअरचे कुलूप काढून १ लाख ३४ हजार ७५४ रुपयांची पळविलेली २४ बंडल कॉपर वायर जप्त केली.

पोलिसांनी सांगितले, की ताराबाई पार्क येथील जीएसटी भवानात इलेक्ट्रीक काम सुरू आहे. त्यासाठी दिल्लीतील कंपनीला काम दिले. त्यांनी त्यांचे साहित्य जीएसटी भवानातील तिसऱ्या मजल्यावरील स्टोअरमध्ये ठेवले होते. तेथे कॉपर वायरचे २४ बंडल होते. ते चोरीस गेल्याची फिर्याद कार्यालयातील अधिकारी रवींद्र अरुण पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तेव्हा चोरीस गेलेली वायर विक्रीसाठी दोन संशयित मेर वेदर मैदानावर येणार असल्याची माहिती कॉन्स्टेबल शुभम संकपाळ, लखन पाटील यांना मिळाली. त्यानुसार तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी जीएसटी भवानातून वायर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडील चोरीची २४ बंडल वायर जप्त केली. पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, बाबा ढाकणे, विकास चौगले, रवी आंबेकर यांनी ही कारवाई केली. पोलिस नाईक वैभव अतिग्रे तपास करत आहेत.

चौकट
चोरटे अभिंयता आणि कामगार?
दोन्हीही चोरटे पोलिस रेकॉर्डवरील नाहीत. ते कोल्हापुरातच मिळेल ते काम करीत आहेत. वेगवेगळ्या ठेकेदाराकडे त्यांचे काम सुरू असते. दोघांपैकी हरेराम हा अभियंता असल्याचे पोलिसांना सांगत आहे, तर दुसरा गुलशन हा कामगार असल्याचे सांगतो. ते नक्की कोण आहेत? याचीही खातरजमा पोलिस करीत आहेत. त्यांनी ही चोरी का केली. याचाही तपास सुरू असल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी दिली. अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT