कोल्हापूर

रस्ते प्रकल्पासाठी एकच निविदा

CD

रस्ते प्रकल्पासाठी
केवळ एकच निविदा
फेरनिविदेची शक्यता
कोल्हापूर, ता. १८ ः शहरातील १०० कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पासाठी केवळ एकाच ठेकेदाराने निविदा भरली. स्पर्धेसाठी किमान तीन निविदा आवश्‍यक असल्याने फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे.
१६ मुख्य रस्त्यांसाठी २७ जूनला निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर प्री बिड बैठकीसाठी स्थानिकांसह पुणे, अहमदनगर आदी ठिकाणच्या पाच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता होती. त्या बैठकीत सुचवलेल्या विविध सूचनांचा अंतर्भाव करण्यात आल्याने १४ जुलैऐवजी १८ जुलैपर्यंत निविदा भरण्याची मुदत वाढवली होती. पण मुदत वाढवूनही केवळ एकाच ठेकेदाराने निविदा भरली आहे.
निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनावर टिका करण्यात आली. त्यानंतर शहरात विविध चर्चा सुरू झाल्या. तसेच या योजनेतील रस्ते शहरातील असल्याने त्यासाठीच्या अटींमुळे ठेकेदारांसमोर मोठी आव्हाने होती. या साऱ्यामुळे ठेकेदारांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले. स्पर्धेसाठी निविदाधारक आले नाहीत तर फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT