कोल्हापूर

ए. वाय. बडतर्फ

CD

राष्ट्रवादी काँग्रेसमधून
ए. वाय. पाटील बडतर्फ

अजित पवार यांच्यासोबत गेल्याचा फटका

कोल्हापूर, ता. १८ ः राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना पक्षातून आज बडतर्फ करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला. त्याचदिवशी ए. वाय. यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीतून भाजपसोबत गेल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ आमदारांसह अन्य आमदारांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर या मंत्र्यासोबत गेलेल्या जिल्हाध्यक्षांचीही माहिती घेण्याचे काम सुरू होते. ही यादी निश्‍चित झाल्यानंतर आज पक्षातर्फे ए. वाय. पाटील यांना बडतर्फ करत असल्याचे जाहीर करण्यात आले.
कारवाई केलेल्यात ए. वाय. यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील २१ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणाशी विसंगत भूमिका घेतल्याचा ठपका सर्वांवर ठेवला आहे. त्याचबरोबर या सर्वांनी पक्षाचे नाव, चिन्ह वापरू नये असा इशारा दिला असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही या नोटिशीत दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT