कोल्हापूर

गडहिंग्लजला प्रशासन अलर्ट मोडवर

CD

19050
हेब्बाळ कसबा नूल : संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद मगर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी किरण खटावकर, अरुण मिरजे, नागाप्पा शिंगे आदी उपस्थित होते.


गडहिंग्लजला प्रशासन अलर्ट मोडवर
संभाव्य पूरपरिस्थितीवर नियोजन; गावागावांत बैठका घेऊन सूचना
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हिरण्यकेशी, घटप्रभा नदी पात्राबाहेर पडली आहे. शिवाय पावसाचा जोर अजून काही दिवस राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजन केले जात आहे. गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आज पूरबाधित गावांना भेट दिली. स्थानिक प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना केल्या.
गडहिंग्लज तालुक्यातून हिरण्यकेशी व घटप्रभा अशा दोन नद्या वाहतात. या नद्यांना सन २०१९ व २०२१ साली महापूर आला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हिरण्यकेशीच्या महापुरात २० गावे, तर घटप्रभेच्या महापुरात तीन गावे बाधित झाली होती. गेल्या आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. दोन दिवस पावसाची उघडझाप सुरू असली तरी अजून काही दिवस पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आल्या आहेत.
दरम्यान, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आज हिरण्यकेशी नदीच्या पुरात बाधित होणाऱ्या दुंडगे, हिटणी, हेब्बाळ कसबा नूल, अरळगुंडी, कडलगे या गावांना भेट दिली. या गावातील पूरस्थितीची पाहणी केली. महापूर आलाच तर बाधितांचे ज्या ठिकाणी स्थलांतर करायचे आहे, अशा निवारा केंद्रांची तपासणी केली. तसेच स्थानिक प्रशासन, शासकीय कर्मचारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मागील दोनवेळच्या महापुरात आलेल्या अडचणी पुन्हा उद्भवू नयेत यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. सहायक गटविकास अधिकारी किरण खटावकर उपस्थित होते.
-------------
चौकट...
या केल्या सूचना...
- शासकीय कार्यालये पाण्याखाली जात असतील तर कागदपत्रे सुरक्षितस्थळी हलवा
- शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात थांबावे
- पिण्याचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्या
- गरोदर माता, बाळंतीन, आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी
- नदीच्या पाण्याची पातळी दर दोन तासांनी तपासावी. त्याची नोंद ग्रामपंचायतमधील नोंदवहीत करावी
- स्वस्त धान्य दुकानात पुरेसा धान्यसाठा ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT