कोल्हापूर

तातडीने मंजूर पदे भरण्याची सूचना

CD

मंजूर पदे तातडीने
भरण्याची सूचना
इचलकरंजी ः शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार फायरमन आणि वाहनचालक पदे तातडीने भरण्याबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधितांना दिल्या. महापालिकेच्या वाहन व अग्निशमन विभागाची आज त्यांनी बैठक घेऊन या दोन्ही विभागातील कामकाजाची माहिती घेतली. अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नवीन दोन अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आयुक्त दिवटे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या प्राथमिक शाळेत अग्निशमन उपकरण बसवावे, विद्यार्थ्यांना अग्निशमन यंत्रणेविषयी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण, प्रथमोपचार याविषयीची माहिती द्यावी, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रात्यक्षिके घ्यावीत, अशा विविध सूचना त्यांनी मांडल्या. बैठकीस अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधीक्षक राजेंद्र मिरगे, मेकॅनिक भागोजी निर्मळे, अनिल कांबळे, प्रशांत आरगे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT