कोल्हापूर

आजऱ्यात हिरकणी एसटीचे लोकार्पण

CD

20238
आजरा : येथील बसस्थानकात हिरकणी बसच्या लोकार्पणप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर, अशोक चराटी, जयवंतराव शिंपी व अन्य मान्यवर.

आजऱ्यात ‘हिरकणी’चे लोकार्पण
आजरा, ता. ३१ : येथील आजरा बसस्थानकामध्ये आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या पाच हिरकणी बसचे लोकार्पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी अण्णा भाऊ संस्थेचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिेंपी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, नगरसेविका संजीवनी सावंत, नगरसेवक अभिषेक शिंपी, संजय सावंत, दशरथ अमृते, आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘‘या आगारामध्ये आरामदायी एसटीची संख्या वाढल्याने प्रवाशांना सुखकर प्रवास करावयास मिळणार आहे. आगारातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पावसाळ्यात गळणाऱ्या, एसटीमुळे प्रवाशांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आता नव्याने मिळालेल्या हिरकणी आरामदायी एसटीतून प्रवास करता येणार आहे. नव्याने पाच हिरकणी बस आजरा आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्याने तालुक्यातील प्रवाशांची लांबपल्याच्या प्रवासाची अडचण दूर होणार आहे.’’ या वेळी विविध पक्ष संघटनाचे प्रतिनिधी, प्रवाशी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT