कोल्हापूर

इचलकरंजीचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

CD

इचलकरंजीचे शिष्टमंडळ आज
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

सुळकूड पाणी योजनाः गैरसमजाबाबत बाजू मांडणार

इचलकरंजी, ता.३१ ः सुळकूड उद्‍भव असलेली दुधगंगा योजना मार्गी लावण्याबाबत इचलकरंजीतील एक व्यापक शिष्टमंडळ उद्या (ता. १) दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेणार आहे. दुधगंगा (सुळकूड) योजना अंमलबजावणी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेवून योजनेबाबत निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी बाजू मांडणार आहे. कृती समितीचे निमंत्रीत विठ्ठल चोपडे यांनी ही माहिती दिली.
इचलकरंजी शहरासाठी अमृत दोन योजनेतून दुधगंगा योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. ही योजना दृष्टीपथात येत असतानाच कागलमधील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी विरोध केला आहे. दूधगंगा काठावरील काही गावांनी यापूर्वीच विरोध नोंदवला आहे. आता नेतेमंडळींचाही विरोध झाल्याने या योजनेचे पुढे काय, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय नेतेमंडळींनी पाणीप्रश्नी हालचाली सुरु केल्या आहेत. दुधगंगा योजनेबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी रेखावार हे शासनाला पाठवणार आहेत. त्यामुळे इचलकरंजीकरांची भूमिकाही महत्वाची आहे. शिष्टमंडळात खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT