‘राजीव गांधी भारतातील संगणक युगाचे जनक’
कोल्हापूर : ‘भारतातील संगणक युगाचे जनक म्हणून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ओळखले जाते. त्यांनी दूरदृष्टीने भारतात संगणक आणि माहिती तंत्रज्ञान सेवांचा प्रारंभ केला’, असे शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त सद्भावना दिन झाला. प्रबंधक मनीष भोसले यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांनी सद्भावना प्रतिज्ञाचे वाचन केले. १९९३ पासून देशभर सद्भावना दिन साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
...
कमला महाविद्यालयात नवागतांचे स्वागत
कोल्हापूर : कमला महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर होत्या. डॉ. मुडेकर म्हणाल्या, ‘‘ध्येय बाळगा आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नवादी राहा’. उपप्राचार्य प्रा. एम. एन. जाधव, प्रा. एच. व्ही. पुजारी, प्रा. आर. पी. प्रधान, प्रा. तृप्ती माने यांनी विविध शाखा आणि विभागांची माहिती दिली. दीपाली पाटील, साक्षी वडर, अनन्या जाधव, हेमाश्री पंड्या यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. माधवी माळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रियांका माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. सनदे यांनी आभार मानले.
--
हनुमाननगर परिसर नागरिक संघाची सभा
कोल्हापूर : हनुमाननगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सांस्कृतिक भवनात झाली. डॉ. शिवाजी हिलगे अध्यक्षस्थानी होते. सचिव बाळासाहेब साळोखे यांनी अध्यक्षांचे मनोगत वाचून दाखवले. कोषाध्यक्ष प्रकाश देसाई यांनी ताळेबंद आणि अंदाजपत्रक वाचून दाखविले. संचालक शरद कारखानीस यांनी प्रकाश हळबे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. संचालक, पदाधिकारी शामराव पाटील, भूपाल देसाई, रमेश निपाणीकर, शंकरराव माने, चौगुले, शिवाजी पवार, दत्तात्रय कुलकर्णी, उर्मिला भोसले, संस्थेचे सल्लागार प्रसन्न कोळेकर, श्रीकृष्ण वाघ, डॉ. रामराव पाटील, संभाजी भोसले, सेवक दिलीप शिंदे उपस्थित होते.
...
वैश्य बोर्डिंगतर्फे रविवारी कार्यक्रम
कोल्हापूर : वैश्य बोर्डिंग, वैश्य महिला मंडळ, वैश्य नागरी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रविवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता रंकाळवेस येथील वैश्य बोर्डिंगमध्ये होणार आहे. यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी वैश्य बोर्डिंगमध्ये २० तारखेअखेर मार्कलिस्ट झेरॉक्स, मोबाईल नंबरसह अर्ज करावा. यामध्ये ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, इतर क्षेत्रातील विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीधारक, दहावी/बारावी, पदवी/पदविका, पदवीधर/पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.