कोल्हापूर

बदल स्वागतार्ह, स्वीकारार्हही असावा

CD

बदल स्वागतार्ह, स्वीकारार्हही असावा
समाजवादी प्रबोधिनीमध्ये ‘तीन कायद्यातील बदल’ वरील चर्चासत्रात सूर

इचलकरंजी, ता. २१ : केंद्र सरकारने आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडंस या कायद्यांमध्ये सुधारणा करणारी विधेयके लोकसभेत सादर केली. भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षासंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशी नव्या कायद्यांची नावे असून ही तिन्ही विधेयके संसदेने स्थायी समितीकडे पाठवलेली आहेत. नवा बदल स्वागतार्ह व स्वीकारार्हही असला पाहिजे याची दखल स्थायी समितीने घेतली पाहिजे, असे मत समाजवादी प्रबोधिनीमध्ये आयोजित तीन कायद्यातील बदल या चर्चासत्रात व्यक्त केले.
केंद्र सरकारकडून गुलामगिरीची बीजे नष्ट करण्याचे हेतूने हे बदल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दीडशेहून अधिक वर्षे जुने असलेले ब्रिटिशकालीन कायदे बदलणे गरजेचे होते यात शंका नाही. पण हे बदल अन्यायकारी अथवा मनमानीला चालना देणारे नसावेत. राष्ट्रद्रोह हा शब्द काढून टाकण्यात येणार असून ‘देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला आव्हान देणे’ हा नव्या संहितेतील गुन्हा आहे. पण नेमके काय हे ठरवण्याचा अधिकार सरकारकडे राहणार आहे. त्यामुळे सरकारविरोधी बोलले तरी तो देशाचा अपमान ठरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणूनच या बदलांचे स्वागत करताना त्याचा तपशील पाहणेही महत्त्वाचे आहे, असे मत मांडले.
संहिता बदलली म्हणून व्यवस्थेची मानसिकता बदलत नसते. कोणताही कायदा हा कोणत्या वर्षी बदलला गेला त्यावरून आधुनिक ठरत नसतो. तर सरकारची मानसिकता किती आधुनिक आहे हे महत्त्वाचे ठरते. जुन्या दंड संहितेत आरोपीला अटक केल्यानंतर पंधरा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची तरतूद होती. नव्या बदलात ही मुदत ६० ते ९० दिवस केलेली आहे. असे अनेक बदल करण्यामागे नक्की मानसिकता काय याचा विचार केला पाहिजे. बदल हा अपरिहार्य असतो. पण त्याचबरोबर तो स्वागतार्ह व स्वीकारार्हही असला पाहिजे याची दखल स्थायी समितीने घेतली पाहिजे. असे मत चर्चासत्रात व्यक्त केले. चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर ,अशोक केसरकर, प्रा.रमेश लवटे, शकील मुल्ला, राजन मुठाणे, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी आदींनी सहभाग घेऊन मते मांडली.
--------
खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले
गेल्या काही वर्षात वैचारिक विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची प्रकरणे वाढत आहे. भारतीय संविधानाचा आणि गंगाजमुनी परंपरेचा आदर न करणारी एक विचारधारा कार्यरत आहे. परिणामी देशद्रोहाची प्रमाणपत्र वाटणारे स्वयंघोषित ठेकेदार वाढलेले आहेत. काही वर्षात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना, लेखकांना, कलावंतांना, विचारवंतांना, संपादकांना देशद्रोही म्हणून हिणवण्याचा, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलेले असल्याचेही मत चर्चासत्रात व्यक्त केले.

जगताप
----जेरे--1.50--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT