31358/ 31359/31360
कोल्हापूर : श्री गणेशाचं आगमन होत असल्याने लक्ष्मीपुरी मंडईत फळांच्या गाड्यांवर फळ जास्त दिसत होती; तर दुसऱ्या छायाचित्रात श्री अंबाबाई मंदिर परिसरात फुलांच्या करंड्या भरून वाहत होत्या. तिसऱ्या छायाचित्रात पवतं घेण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर परिसरात अशी गर्दी होती.
(सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)
नैवेद्याच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी
पॉलिश खपली गव्हाला मागणी : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर बाजारात उत्साह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : श्री गणरायाचं आगमन मंगळवारी (ता. १९) होत आहे. या पाश्र्वभूमीवर नैवेद्यासाठी लागणाऱ्या खीर, मोदकाचे साहित्य, पूजेचे साहित्य, फुले, केळीची पानं, केळीचे मोने, अखंड कर्दळी, केवडा घेण्यासाठी लक्ष्मीपुरीसह महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर परिसर, भवानी मंडप, कपिलतीर्थ परिसराबरोबर उपनगरातील मंडईत गर्दी होती.
नैवेद्यासाठी पुरणपोळी व खीर करण्यासाठी गूळ, हरबरा डाळ, रवा, मैदा, पोळीच्या आट्याला मागणी आहे. ही मागणी गणेश चतुर्थी होईपर्यंत राहील, असे व्यापारी बबन महाजन यांनी सांगितले. याबरोबर खीरीत घालण्यासाठी मिक्स्ड ड्रायफ्रुटस्, किसलेले खोबरे, खोबरे पावडरीची विक्रीही जास्त होते. गणेश चतुर्थीपासून ते दिवाळीपर्यंत या वस्तूंना मागणी असते.
चौकट
पवतं/कापसाला मागणी अधिक
पवती, फूल वात, समईची वातही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. सर्व किराणा मालाची दुकानांबरोबर अनेक विक्रेते महाद्वार रोड, श्री अंबाबाई मंदिर परिसरात पवतं, फुलवाती विक्रीसाठी उभे होते. या काळात पवत्यांची विक्री सर्वाधिक होते. पूर्वी पवतं घरी केले जायचं. आता तयार मशिनमधून तयार केलेली फुलवात, पवतं मिळते. १०/२० रुपयाला पॅकेट असते. गणेश मंडळाच्या गणपतीसाठी लागणारी पवतं मोठ्या आकारची असतात. त्यामुळे कापसाची मोठी विक्री आज झाली. सजावटीतही कापसाचा वापर अधिक होतो.
चौकट
नैवेद्य साहित्य प्रतिकिलो रुपये
गुळ *५५/६०
रवा/मैदा/पोळीचा आटा प्रत्येकी *४०
मिक्स्ड ड्रायफ्रुटस्चे पॅकेट *६००/८००
किसलेले खोबरे *१८०
खोबऱ्याची पावडर *१८०
पूर्ण खोबरे *१६०
...............................
खाद्यतेलाचे दर स्थिर
कोल्हापूर, ता. १७ ः गेली दीड वर्षे खाद्यतेलाचे दर सामान्य ग्राहकांच्या टप्प्यात आले. परिणामी, खाद्यतेलाचा वापरही दररोज वाढला. सणासुदीचे दिवस असल्याने खाद्यतेलाला मागणीही वाढली. खाद्यतेलाची पॅकेटस्, टिन-प्लास्टिकची कॅन्स्, खाद्यतेलाचा डबा अशा स्वरुपात खाद्यतेल उपलब्ध आहेत. त्यातही शेंगतेलापेक्षा सरकी, सूर्यफुलाला ७० ते ७५ टक्के तर अन्य तेलांना दहा ते पंधरा टक्के ग्राहकांकडून मागणी आहे. सरकी, सूर्यफुलाची अधिक प्रमाणात विक्री होते.
खाद्यतेलांचे दर (प्रतिकिलो रुपये)
सरकी *११० प्रतिकिलो
सूर्यफूल *११०/१३० रुपये लिटर
शेंगतेल *२२० रुपये लिटर
.......................................
फुलांचा बाजार बहरला
कोल्हापूर, ता. १७ ः श्रावण, भाद्रपद सुरू झाला की व्रतवैकल्ये, पूजा-अर्चेसाठी फुलांची मागणी वाढते. ही सर्व फुले कंदलगाव, कणेरीवाडी, पन्हाळा, राधानगरी, कागल, शिरोळ आदी भागांतून कोल्हापूरच्या बाजारपेठेत येतात. मागणी वाढली की, फुलांचे प्रतिकिलो दर काहीसे वाढविले जातात. तरीही लोक फुले मोठ्या प्रमाणात विकत घेतात.
चौकट
फुलंचे दर (प्रतिकिलो/प्रतिनग रुपये)
शेवतं *२५०
ॲस्टर *१० रुपये जोडी
गुलाब *५० रुपयांची जोडी (१० गुलाब फुले)
काळी तुळस *४०/५० रुपये जोडी
गवरीची फुलं (तेरडा फुल) *१००
केवडा *५०/८०/१०० रुपये प्रति नग
दुर्वाची जोडी *१०/२० रुपये पेंडी
पिवळा/केशरी झेंडू *८०/१००
आघाड्याची पानं *१० रुपये पेंडी
कर्दळी *५० रुपये दोन ते तीन जोडी
केळीची पानं *१०/२० रुपये प्रति पान
आंबेरी (आंब्याची पानं) १० रुपये पेंडी
धोतऱ्याची फळं *१०/२० रुपये नग
निळे/गुलाबी कमळ *१०/२० रुपये प्रति नग
श्रीविष्णूंच्या पूजेसाठी लागणारी शमीची पाने *१० रुपये पेंडी
हळीदीची पानं *१० रुपये पेंडी
ीरुईची पाने *१० रुपये पेंडी
चाफ्याची पाने *१० रुपये पेंडी
.............................................
प्रसादासाठी फळांनाही मागणी
श्री गणेश मूर्तीसमोर पाच फळांचा नैवेद्य आगमनानंतर ठेवला जातो. याशिवाय दररोजच्या प्रसादामध्ये फळांचे महत्त्व असते. यासाठी ही फळे घेण्यासाठी आज गर्दी होती. फळांची सर्वाधिक विक्री आज झाली. उद्या (ता. १८) फळे घेण्यासाठी आणखी गर्दी वाढेल, असे फळ विक्रेते यासीन बागवान यांनी सांगितले. मुस्ताफाभाई म्हणाले, ‘‘देशी पेरू आणि थायलंडची पेरूची आवक सोलापूर, सांगलीच्या पूर्व भागातून वाढली आहे. पेरूलाही प्रसादात अधिक मागणी असते.’’ सीमला सफरचंदांची आवक होण्याचे हे दिवस असतात. मात्र यावर्षी उत्तर भारत, काश्मिरी भागात बेसुमार अतिवृष्टी झाली. परिणामी, सफरचंदांच्या बागा नष्ट झाल्या. पुरात वाहून गेल्या. त्यामुळे सफरचंदांची आवक या वर्षी खूप कमी आहे. तुर्कीमध्ये भुकंप झाल्यामुळे तेथील सफरचंदाची आवकही कमी झाली आहे.
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)
सीमला सफरचंद (छोटा आकार) *१०० रुपयेला दीड किलो/दोन किलो
सीमला सफरचंद (मोठा आकार) *१२०/१५०
चिक्कू *५०
मोसंबी *५०
पपई *२०/३० (श्रेणीनुसार)
डाळिंब *१५०
देशी पेरू *१००
थायलंड पेरू *१२०
शुगर क्वीन कलिंगडे *१०० रुपये नग
गणेश मूर्तीसमोर प्रसादासाठी लागणारी पाच फळं *१००
...................
31346
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत पालेभाजी, फळभाज्यांची आवक जास्त होती.
लसूण, आल्ल्याचे वाढले दर
मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंडी ः इंदुरी बटाटा ३० रुपये किलो
कोल्हापूर, ता. १६ : या आठवड्यात लसूण १४० तर आल्लं १५० रुपये किलो झालं. अन्य फळभाज्यांचे दर ४० रुपये किलोंपर्यंत होते. आवकही भरपूर होती. गणेशाचं आगमन होत असल्यामुळे शेकेला लागणाऱ्या फळभाज्यांची विक्री अन् खरेदी जास्त होती. शेकेमध्ये घेवडावर्गीय भाजी जास्त प्रमाणात लागते. याशिवाय, पालेभाज्याही तुलनेने स्वस्त होत्या. फक्त मेथी आणि कोथिंबीर मात्र २० रुपये पेंडी होती. इंदुरी बटाट्याचा दर ३० रुपये किलो झाला. हा बटाटा आगरा बटाट्यापेक्षा चविला चांगला असून, मागणीही जास्त असते.
चौकट
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये) कारले *४०
दोडका *४०
हिरवी वांगी *४०
ढब्बू मिरची *४०
कोबी गड्डा *१० रुपये नग
फ्लॉवर *२० रुपये नग
भेंडी *४०
शेवगा शेंग *१०
स्वीट कॉर्न *१० रुपयाला नग
दुधी भोपळा *१० रुपये नग
भुईमूग शेंग *८०/१००
रताळे *२०
लसूण *१४०
्आल्ले *१५०
लाल बीट *१० रुपये नग
मुळा *१० रुपये एक नग
लिंबू *१० रुपयाला चार ते पाच नग
बंदरी गवारी *४०
देशी गवारी *८०
वालाची शेंग *४०
उसावरील शेंग *४०
काळा घेवडा शेंग *४०
ंहिरवी मिरची *४०
हेळवी कांदा *२५
आगरा बटाटा *२५
ंइंदूरी बटाटा *३०
कच्ची केळी *४०/५० रुपये डझन
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
लाल भोपळा *४०
वरणा *४०
पापडी शेंग*४०
चौकट
पालेभाजी (दर प्रतिपेंडी)कोथिंबीर *२०
मेथी *२०
कांदापात-शेपू-लाल माट-तांदळी-आंबाडा-पोकळा-पालक *१०
कडीपत्ता *५
पुदीना *५/१०
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर
सोने (प्रति तोळा) : ६०, ८२५
चांदी (प्रतिकिलो) : ७४, ७००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.