कोल्हापूर

मॉर्निंग वॉक ठरतेय जीवघेणे

CD

मॉर्निंग वॉक ठरतेय जीवघेणे
गडहिंग्लजला दशकभरात पाचहून अधिक मृत्यू ः पुरेशी मैदाने नसल्याने रस्त्यांचाच पर्याय
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : तंदुरुस्त राहायचे असेल तर डॉक्टर म्हणतात चालायला जा. पुरेशी मैदाने नसल्याने नागरिकांना चालायला रस्त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दशकभरात चालायला जाणाऱ्या पाचहून अधिक जणांना भरधाव वाहनांनी धडक दिल्याने जीव गमवावा लागला आहे. परिणामी, मॉर्निंग वॉक नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. चालायला जाणाऱ्यांची किरकोळ अपघातांची मालीका नेहमीची आहे. यामुळे वॉकिंग ट्रॅकसाठी आणखी किती बळी द्यायचे, असा सवाल संतप्त नागरिकांचा आहे.
माजी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष कदम यांचा मॉर्निंग वॉकवेळी वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याने अवघे शहर हळहळले. दशकभरात अशा घटना वाढतच चालल्या आहेत. दशकभरात पाचहून अधिक जणांना रस्त्यावर मृत्यूने गाठले. मॉर्निंगवॉकवेळी छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या तर खूपच मोठी आहे. प्रत्येक महिन्याला २-४ घटना ठरलेल्या आहेत. अपघात झाला की ४-८ दिवस वॉकिंग ट्रॅकच्या आवश्यकतेची चर्चा सर्वत्र रंगते. पण, पुन्हा मागील पानावरून पुढे म्हणत हा प्रश्न रेंगाळतच राहिला आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यातून आजरा आणि संकेश्र्वर मार्गावर पायी जाणेही भविष्यात दिव्य ठरणार आहे.
दोन दशकांत शहराचा विस्तार झपाट्याने वाढला. साहजिकच रस्ते तेच पण वाहनांच्या संख्येत चौपटीहून अधिक वाढ झाली. लोकसंख्येच्या तुलनेत मैदाने कमी असल्याने ती खेळाडूंनाच पुरेशी नाहीत. यामुळे रस्त्यावर चालायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खासकरून पहाटेपासून सर्वच रस्ते मॉर्निंग वॉकसाठी फुलले असतात. सकाळच्या सत्रात लांब पल्ल्याची खासगी वाहने आपपली गावे गाठण्यासाठी भरधाव पळत असतात. ही अनियंत्रित वाहने ज्येष्ठ नागरिकांसाठी जणू यमच बनत आहेत. कारण आरोग्यासाठी चालावे तर वाहनांचा धोका आणि घरात बसले तर व्याधींचा विळखा अशी इकडे आड तिकडे विहीर अशी विचित्र स्थिती नागरिकांची आहे.
--------------------
उदासीन लोकप्रतिनीधी, प्रशासन
रस्ते, गटारी या पलीकडेही विकास आहे. याचा जणू विसरच लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासनाला पडला आहे. मूलभूत गरजा पाठोपाठ नागरिकांचे आरोग्यही सध्याच्या काळात महत्त्वाचे बनले आहे. अधिक मैदाने, वॉकिंग ट्रॅक ही सर्वाधिक गरजेचे बनले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
--------------
कोरोनापासून लोकांमध्ये तंदुरुस्तीची जागरुकता वाढली आहे. खासकरून ज्येष्ठांना व्यायामासाठी चालणे हाच पर्याय आहे. पण, वाढलेल्या वाहनांमुळे रस्त्यावर चालणे महामुश्कील बनले आहे. त्यासाठी पालिकेने २-३ ठिकाणी वॉकिंग ट्रॅक करायला हवेत.
- मल्लिकार्जुन बेल्लद, नागरिक, गडहिंग्लज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

Sakal Podcast: कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती

कुमक कमी, तरी पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ यशस्वी! सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभेची निवडणूक शांततेत; ८२८ बूथचे ४५ सेक्टर करून पोलिस आयुक्तांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, चार बांगलादेशी नागरिकांना अटक

5 वर्षांनंतर सोलापूरला मिळणार स्थानिक पालकमंत्री? सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी; दोन्ही देशमुख की कल्याणशेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT