कोल्हापूर

गायीचे दूध दर कमी

CD

गाय दूध दर कपातीबाबत नाराजी
दर पूर्ववतची मागणी : खासगी संघाकडूनही आज कपात शक्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने गाय दूध दरात कपात केल्यामुळे उत्पादकांकडून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. लम्पीमुळे गायीची संख्या कमी होत आहे आणि दुसरीकडे दर कमी झाल्यामुळे उत्पादकांचे गणित बिघडणार आहे. त्यामुळे कपात केलेली दरवाढ नव्याने पूर्ववत करावी, असा सूर उमटत आहे.
गोकुळने म्हैस दूध दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करुन दिलासा दिला. मात्र, गाय दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. बहिरेश्र्वरसह इतर काही गावांमध्ये कपात केलेले दर पुन्हा वाढवावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट्य आहे. यामध्ये गाय दूधाचे संकलनही महत्वाचे आहे. एकीकडे तरुणांनी दूध उत्पादन व्यवसाय करावा यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींकडून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे दरात कपात झाल्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे. गायीसाठी चारा, औषधपाणी यासह इतर खर्च करताना मेटाकुटीला आलेल्या उत्पादकाला दर कपातीचा धक्का सहन होणार नाही. पहाटे पाचपासून रात्री आठपर्यंत जनावरांच्या सेवेत राहावे लागते. एक-दोन नव्हे तर कुटुंबाने लक्ष दिल्याशिवाय व्यवसाय सफल होत नाही. त्यामुळे एक-एका जनावरामागे आख्खं कुटुंब काम करत असताना दूध दरातील कपात उत्पादकांचा उत्साह कमी करणारी आहे.
...
चौकट
खासगी संघांचीही दर कपात शक्य
गोकुळनंतर खासगी दूध संघही गाय दूधाच्या दरात कपात आणि म्हैस दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेणार आहेत. मंगळवारी (ता. ३) या सर्व संघांची बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT