कोल्हापूर

लेख

CD

ग्राहकांपर्यंत अचूक पोचविणारं जाहिरात क्षेत्र

आजचं जग जाहिरातींचं जग आहे. योग्य जाहिरातींसाठी केलेला खर्च हा खर्च नसून ती लाखमोलाची नफा अनेक पटींनी वृध्दिंगत करणारी गुंतवणूक असते. १४ ऑक्टोबर देशात जाहिरात दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वांसाठीच आवश्यक असणाऱ्या जाहिरात दिनाविषयी...
-----------
जून १८३६ मध्ये ला प्रेस या फ्रेंच वर्तमानपत्राने पहिली जाहिरात प्रसिध्द केली. वृत्तपत्राची किंमत कमी आणि पर्यायाने वाचकसंख्या वाढवण्यास त्यांचा हातभार लागला. अर्थातच नफा वाढला. १८४०च्या सुमारास व्होल्नी पामर याने फिलाडेल्फियात जाहिरात संस्थेचे मूळ रुजवले. त्याने वेगवेगळ्या वृत्तपत्रांतली स्पेस विकत घेऊन जाहिरातदारांना चढ्या भावाने विकली. डिझाईन, लेआऊट, कॉपी सगळं जाहिरातदारच करायचा. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जाहिरातीची जागा विकणारी ब्रोकर हे जाहिरात एजन्सीचे स्वरुप बदलले. १८६९मध्ये एन.डब्ल्यू. अय्यर अ‍ॅन्ड सन्स ही फिलाडेल्फियातील जाहिरात संस्था म्हणून उदयाला आली. १९२०च्या सुमारास रेडिओ स्टेशनचा उगम झाला. रेडिओ यंत्रे बनविणाऱ्या उत्पादकांनी रेडिओ विक्रीच्या दृष्टीने कार्यक्रम तयार केले. कार्यक्रमाच्या सुरुवात व शेवटी प्रायोजकाचे नांव, उत्पादन उद्घोषित होऊ लागले. यातून त्यांना पैसे मिळू लागले. १९४० ते १९५० च्या दरम्यान दूरचित्रवाणीचा उदय झाला. १९५० मध्ये ड्यू माँट टेलिव्हिजन नेटवर्कने जाहिरातींसाठी प्रायोजक स्वीकारले.
१९६०च्या दशकात चॅनेल्स आले. भारतात पहिली छापील जाहिरात पहिल्या साप्ताहिक वृत्तपत्रात आली. त्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट ! मुंबईस्थित बी. दत्तारा अ‍ॅन्ड कंपनी सर्वात जुनी जाहिरात संस्था. देशात पहिली अ‍ॅड एजन्सी दत्ताराम बावडेकर ऊर्फ बी. दत्ता यांनी १४ ऑक्टोबर १९०५ ला सुरू केली तोच दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन.
१९१२ मध्ये इंपिरीयल टोबॅको कंपनी लि.ने गोल्ड फ्लेक सिगारेटचा ब्रॅन्ड आणला. यानंतर अनेक कंपन्यांनी पार्टनरशिपद्वारे जाहिरात संस्था काढल्या. टाटा पब्लिसिटी, नॉर्विक्सन अ‍ॅडव्हर्टायझिंग, ऑगिल्व्ही अ‍ॅन्ड मॅथर (ही डी. जे. केमर यांनी अस्तित्त्वात आणली.) या जाहिरात कंपन्यांचा उदय झाला. १९२६ ला आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपन्यांचा उदय झाला. १९३८ मध्ये कोल्हापूला जयेंद्र पब्लिसिटीची स्थापना झाली. १९६७ ला पहिली कमर्शियल जाहिरात विविध भारतीवर, तर १९७० मधे रेडिओ सिलोनवर जाहिरातीचा पहिला स्पॉट आला. १९९१ मध्ये झी टीव्हीसारख्या प्रायव्हेट चॅनेल्सचे प्रक्षेपण सुरु झाले. आज मोबाईल, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम, व्टिटर, मेसेंजर, टेलीग्राम अशा अ‍ॅपस्‌द्वारे जाहिरात क्षेत्र विकसित होत आहे.

- महेश कराडकर
अध्यक्ष, फेम (फेडरेशन ऑफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅन्ड मीडिया आंत्रप्रुनर्स)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT