कोल्हापूर

इचल ःवस्त्र नगरीत भटकी कुत्री व मानव संघर्ष

CD

वस्त्रनगरीत कुत्र्यांची दहशत
महिन्यात दीडशेजणांना चावा : उपद्रव रोखायचा कसा?

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. ३१ : वस्त्रनगरीस कायम जागी असणारी नगरी म्हणून परिचित आहे. औद्योगिक शहर असल्याने २४ तास काम सुरू असते. त्यामुळे रात्री-अपरात्री कर्मचारी येत-जात असतात. मात्र, शहरात टोळक्याने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. रात्री भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. यावर महापालिका प्रशासन केवळ उपाययोजना करीत असल्याचे भासवत असल्याने वस्त्रनगरीत भटकी कुत्री व मानव असा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे.
वस्त्रनगरीत सूर्य मावळत जाऊन अंधार होण्यास सुरुवात झाली की रस्त्यावर असणारी नागरिकांची वर्दळ कमी होते. रस्ते निर्जन झाल्यानंतर दहशत सुरू होते भटक्या कुत्र्यांची. दिवसभर विविध ठिकाणी भटकणारी कुत्री रात्री टोळ्यांनी फिरतात. यावेळी ते वाहने, नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न करतात. शहरात कामगारवर्ग अधिक आहे. हा वर्ग रात्री-अपरात्री सायकल, दुचाकीवरून कामावर किंवा घरी जात असतो. अशा निर्जनवेळी भटकी कुत्री टोळीने हल्ला करत आहेत. हल्ल्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नांत दुचाकीवरून नियंत्रण सुटून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे रात्रपाळीत काम करणारे कामगार प्रचंड दहशतीखाली वावरत आहे.
शहरात पाच हजारहून अधिक भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. अलीकडेच या कुत्र्यांच्या टोळीच्या हल्ल्यात ७२ वर्षीय वृद्ध महिलेला प्राणास मुकावे लागले होते. या वृद्धेचे भटके कुत्रे तीन तास लचके तोडत होते. ज्यावेळी नागरिकांनी पहिले त्यावेळी वृद्धा रक्ताचा थारोळ्यात पडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना होती. त्यानंतरही कुत्र्यांचे हल्ले सुरूच आहेत. महापालिका प्रशासन कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही. त्यांना जंगलात सोडता येत नाही. याआधी निष्फळ ठरलेले निर्बीजीकरण हा एकमेव मार्ग असल्याचे सांगते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखायचा कसा असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.
------------------------
चौकट
...म्हणून कुत्री हिंस्र
भटक्या कुत्र्यांना मारण्यावर बंदी, जंगलात सोडण्यावर बंदी तर निर्बीजीकरण मोहीम अयशस्वी यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यातच शहर परिसरात असलेले चिकन ६५, बिर्याणी गाडे यांच्या वेस्टेजमुळे कुत्र्यांच्या हिंस्रपणात वाढ होत आहे. परिणामी शेतात काम करणारे शेतकरी, लहान मुले, वृद्ध यांच्यावर कळपाने जीवघेणे हल्ले वाढत आहेत.
आयजीएममध्ये दररोज सरासरी ७ ते ८ डॉग बाईटचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. हल्ल्यांमध्ये बहुतांशी महिला व शाळकरी मुलांचा समावेश आहे. पहाटे फिरावयास जाणा-यांनीही कुत्र्यांची धास्ती घेतली आहे.
-------------
दृष्टिक्षेप
तारीख * जखमी नागरिक
४ ऑक्टोबर *१९
७ ऑक्टोबर *१८
१०ऑक्टोबर *२२
१४ ऑक्टोबर *२०
१८ ऑक्टोबर *१८
२५ऑक्टोबर *१९
३०ऑक्टोबर *२६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT