कोल्हापूर

रस्ते खड्डे अस्थी विकार

CD

फोटो ः43014
---
आज प्रसिद्ध झालेल्या मुख्य अंक १०२ वरून व्हॉटस्अप आवाहन घ्यावे....
-

रोज १५ जण जखमी
सुरक्षित प्रवासाची नाही हमी

खड्ड्यांनी मोडले कंबरडे ः रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शहरातील विविध मार्गावरून जाताना खड्ड्यातून गाडी चालवावी लागते. अनेकदा अपघात होतात, तर काही वेळी खड्ड्यांच्या रस्त्यावरून सतत गाडी चालवण्यामुळे सांधे दुखी विकार व अपघातात हाडांना होणारी दुखापत धडधाकट व्यक्तीला अधू करते. दहा वर्षांपूर्वी सीपीआर रुग्णालयांत रोज पाच ते सात हांडाची दुखापत झालेले जखमी येत होते. सध्या रोज किमान १५ ते २० जखमी येतात. त्यामुळे रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्याची गरज आहे.
शहरात नोकरी, व्यवसाय किंवा व्यक्तिगत कामासाठी दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. साधारण शहरभरात अडीच लाख दुचाकी गाड्या आहेत. त्याद्वारे किमान ५ ते ४० किलोमीटरचा प्रवास रोजचा घडतो. सकाळी १० ते दुपारी १ तसेच सायंकाळी ६ ते ९ वेळेत गर्दीतून गाडी चालवताना घरी जाण्यास वेळ होतो. म्हणून अनेकजण गाडी वेगात चालवतात. खड्ड्यामुळे हादरे बसतात. काही वेळा गाडी आदळते मागे बसलेली व्यक्ती खाली पडते. किंवा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होतो. अशा अपघातातील जखमी सीपीआरला येतात. यात दहा अपघात झाले तर त्यात चार ते पाच व्यक्तींना फॅक्चर झाल्याचे दिसते. सीपीआरमध्ये उपचार मोफत असले तरी खासगी रुग्णालयात कमीत कमी दहा हजार ते काही लाखापर्यंतचे खर्च करून उपचार घ्यावे लागतात तेव्हा एक खड्डा किमान पन्नास हजारांचे अर्थिक नुकसान करतो तर उपचारासाठी काही महिने नोकरी व्यवसाय बंद ठेवावा लागतो. काहींना आयुष्यभरासाठी अधूपण येते.

कोट
रस्ते अपघातात हाडांना दुखापत झालेले रुग्ण येतात. यात तरुणांची संख्या वाढत आहे तर प्रौढ ज्येष्ठ व्यक्तींना सतत खड्डे असलेल्या रस्त्यावरून गाडी चालविल्याने हाडांचे दुखणे सुरू होते अशा व्यक्ती उपचाराला येतात. पाठ, मनका, कंबर दुखीचे प्रमाण जास्त आहे. ३ ते ६ आटवड्यातील उपचाराने काहीचे अस्थी विकार बरे होतात, तर अपघातातील जखमीमध्ये फॅक्चर असल्यास प्लास्टर किंवा शस्त्रक्रियेची गरज भासते. अशांना ३ महिने ते ९ महिन्यांपर्यंतचे उपचार घ्यावे लागतात.
-डॉ. राहुल बडे, अस्थिरोग विभागप्रमुख, सीपीआर

कोट
रस्‍त्यांवरील खड्ड्यांतून दीर्घकाळ गाडी चालविल्याने अनेकांना पाठदुखी, कंबर दुखी, हाता पायां मुंग्या येणे, सांधे दुखी, हात, पाय, कंबर आखडणे, मान दुखीचा त्रास जाणवतो. त्यांच्या वेदना किंवा दुखापतीची तीव्रता तपासून उपचाराची दिशा ठरते. दोन ते तिन महिने व्यायाम दिले जातात. काहीना अपघातात डोक्याला मेंदूला धक्का पोहचतो. त्यांच्यावर उपचार होतात मात्र काही वेळा हात, पाय अन्य अवयवांची हालचाल मंदावते अशा वेळी फिजोओथेरपी द्यावी लागते. त्याचा कालावधी जास्त असतो.
-डॉ. ऋतुराज शिंदे, फिजिओथेरपिस्ट सीपीआर

चार्ट करणे
आकडे काय सांगतात?
सीपीआरमध्ये महिन्याला येणारे जखमी ः ८००
महिन्याला हाडांच्या शस्त्रक्रिया ः १२०
शहरातील रस्ते अपघातात किमान जखमी ः १५०
सहा महिन्यांत मृत्यू ः ४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT