कोल्हापूर

स्वयंप्रभा शॉपिंग फेस्टिवल उदघाटन

CD

फोटो -42956
-
लोगो - तनिष्का
-

शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा प्रारंभ
स्वयंप्रभा मंचतर्फे आयोजन ः रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः महिलांनी व्यवसायातील कामाचे नियोजन करताना व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन ज्येष्ठ उद्योजिका भारती पोवार यांनी केले. स्वयंप्रभा मंच आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. आज सकाळी व्ही. टी. पाटील सभागृहात शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा प्रारंभ झाला. सकाळ माध्यम समूहाचे तनिष्का व्यासपीठ फेस्टिव्हलचे माध्यम प्रायोजक आहे.
स्वयंप्रभा मंचच्या अध्यक्षा सारिका बकरे प्रास्ताविकात म्हणाल्या, ‘प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून याला उद्योजक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.’’ प्रदर्शनात फराळ, आकर्षक साड्या, मसाले, गृहोपयोगी वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, विविध पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध आहेत. तनिष्काचे समन्वयक राजेंद्र जाधव, जॉय ई बाईकच्या अधिकृत विक्रेते जोतिर्लिंग इंडस्ट्रीजच्या मंदाकिनी दमामे, सतीश दमामे, माईंड ईट संवादचे प्रदीप सोनार उपस्थित होते. स्वयंप्रभा मंचच्या वतीने सारिका बकरे, उपक्रम समन्वयक दिपाली मोरे, ग्रामनिर्भर फाउंडेशनचे संचालक सागर बकरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अरूणा कुंभार यांनी केले.

चौकट
पालवी प्रकल्पातील मुलांचाही सहभाग
पंढरपूर येथील एचआयव्ही बाधित विशेष बालकांच्या पालवी प्रकल्पातील मुलांनी विविध वस्तू बनविल्या असून प्रदर्शनात त्यांचा सहभाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT