कोल्हापूर

‘गोकुळ शिरगाव एमआयडीसी’चा मुख्य रस्ता होणार मजबूत

CD

फोटो 42952
---
मुख्य रस्ता होणार मजबूत
‘गोकुळ शिरगाव एमआयडीसी ः दुभाजकांची उंची वाढणार; दोन्ही बाजूला पथमार्ग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) मुख्य चौपदरी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामाचे उदघाटन आज करण्यात आले. ते काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील मान्यता मिळालेल्या ९९ कोटी १० लाखांची कामे सुरू केली आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील कणेरी फाटा ते गोकुळ चौकापर्यंतच्या मुख्य चौपदरी रस्त्याचे मजबुतीकरण आणि पुनर्अस्तरीकरणासह पथमार्ग करण्यात येणार आहे. गोकुळ चौकापासून पुढील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यातील मुख्य चौपदरी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, उपअभियंता अजयकुमार रानगे, गोशिमाचे अध्यक्ष दिपक चोरगे, उपाध्यक्ष स्वरूप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोशिमाचे सचिव नितीनचंद्र दळवाई, खजिनदार रणजीत पाटील, संचालक मोहन पंडितराव, जे.आर.मोटवाणी, सुनिल शेळके,रणजीत मोरे, सल्लागार संचालक राजेंद्र माळी, अशोक चौगुले, निमंत्रित संचालक प्रशांत मेहता, विनय चौगुले, संगीता कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर गणेश खाडे उपस्थित होते.

चौकट
डिसेंबर अखेर काम पूर्ण होणार
या दीड किलोमीटरच्या मुख्य चौपदरी रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरणाच्या ६ कोटी ७५ लाख रूपयांची निविदा मंजुरी झाली आहे. या रस्त्याचे दोन्ही बाजूला दोन मीटरने रूंदीकरण करून फुटपाथ आणि गटर्स केली जाणार आहेत. दुभाजकांची उंची देखील वाढविण्यात येणार आहे. हे सर्व काम डिसेंबरपर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे गणेश खाडे यांनी सांगितले.
...........
कोट
या रस्त्यासाठी उद्योजकांनी केलेल्या पाठपुराव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रस्ता मजबूत झाल्यानंतर गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-दिपक चोरगे, अध्यक्ष, गोशिमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT