कोल्हापूर

रखडलेली बांधकामे तत्काळ पूर्ण करा

CD

ich312.jpg
43003
इचलकरंजी : आम आदमी पार्टीच्यावतीने उपायुक्त तैमूर मुल्लानी यांना निवेदन देण्यात आले.

रखडलेली बांधकामे तत्काळ पूर्ण करा
आम आदमी पार्टीतर्फे मागणी ः महापालिका उपायुक्त मुल्लांनीना निवेदन सादर
इचलकरंजी,ता. 3 : इचलकरंजी व शहापूर परिसरातील रखडलेली बांधकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने इचलकरंजी महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लानी यांना देण्यात आले.
शहापूर परिसरातील दत्तनगर येथे ड्रेनेजची सुविधा नसल्यामुळे येथील सांडपाणी नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. परिणामी दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी हे केवळ कागदोपत्रीच मर्यादित आहे का ? असे निवेदनात नमूद केले आहे. भविष्यात शहर परिसरातील कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, ड्रेनेज सुविधा व बांधकाम सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा दिला. शिष्टमंडळात अभिषेक पाटील, श्रीकांत वाकरे, अरुण कोपार्डे, इम्रान इनामदार, किसन गोसावी, मीनाक्षी भांडे,रेश्मा खलिफा, कल्पना डावरे आदींसह भागातील नागरिक व महिला सहभागी होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT