फोटो ४८७५७
लोगो
...
लग्न ही विश्वासाने जगण्याची सुंदर गोष्ट
डॉ. गौरी कानिटकर ःनकारात्मक चर्चांनी मुला-मुलींची मने होताहेत कलुषित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः ‘लग्न केले की जबाबदारी येते, स्वातंत्र्य हरवते, स्वतःची स्पेस उरत नाही, अशा नकारात्मक चर्चांनी मुला-मुलींची मने कलुषित होत आहेत. खरेतर लग्न म्हणजे दोन जोडीदार, दोन कुटुंब यांच्यात विश्वासाचे नाते जोडले जाते. सुसंवादातून घरातील नाती टिकवणे, जबाबदाऱ्या दोघांनी उचलणे, घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे आदी संस्कारातून लग्न ही सुंदर गोष्ट असते, ही बाब पालकांनी समजून घेणे व ती मुला-मुलींमध्ये रुजवणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन अनुरूप विवाह संस्थेच्या संचालक डॉ. गौरी कानिटकर यांनी केले.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम व महालक्ष्मी सहकारी बॅंक, तेंडुलकर परिवार यांच्या वतीने आयेजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘विवाह एक समस्या’ या विषयावर त्या बोलत होत्या. व्याख्यानाऐवजी मुलाखत स्वरूपात हा कार्यक्रम घेण्यात आला. पत्रकार चारूदत्त जोशी यांनी मुलाखत घेतली.
डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘लग्न झाल्यानंतर तुमच्याशी संवाद साधणारा हक्काचा जोडीदार, हक्काचे घर लाभते, स्थैर्य येते. घरी कोणीतरी वाट पाहणारे आहे, याची जाणीव निर्माण होते. या साऱ्यातून नात्यांची विण घट्ट होते. या लग्नाच्या सकारात्मक बाबी आहेत. अलीकडच्या काळात करिअरला प्राध्यान्य देण्यात येते. यात लग्नाचे वय वाढले आहे. यात मुली मी किचन सांभाळणार नाही किंवा मुले मी घरात काम करणार नाही, अशी टोकांची भूमिका घेतात. एकमेकांचे मोबाईल तपासतात. इथंपासून ते तू माझ्या या पोस्टवर लाईक कमेंट का केली नाहीस, अशा शुल्लक गोष्टींवरून टोकाचे वाद घटस्फोटापर्यंत पोचत आहेत. ही बाब अधिक गंभीर आहे. असे असले तरी लग्न संस्था कधी रद्दबातल होणार नाही. कारण एकमेकांशिवाय जगता येणे शक्य नाही, याची जेव्हा जाणीव होते, तेव्हा लग्न करण्याशिवाय नाती टिकवण्याशिवाय पर्याय असत नाही. त्यासाठी पालकांनी खंबीर भूमीका घेऊन मुला-मुलींवर लग्नानंतरच्या आयुष्यात कसे जगावे लागेल, यासाठी घरगुती व्यवस्थापनांची शिकवण मुला-मुलींना देणे आवश्यक आहे. काही पालक लग्न झालेल्या मुला-मुलींच्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ करतात की त्यातूनही संसार धोक्यात येण्याचे प्रसंग उद्भवत आहेत.’
...
मंगलविधीला बाजारु स्वरूप
‘मुली लग्नात किंवा लग्नानंतर पुण्यातच घर किंवा फ्लॅट हवा आहे, असे अनेक हट्ट धरत असतात. यात मुले मात्र बिचारी होत असल्याचे काही प्रसंगात दिसते. लग्न ठरवतेवेळी काही पालक आमच्या अपेक्षा नाहीत, असे वारंवार सांगतात. प्रत्यक्षात लग्न ठरवताना पन्नासपेक्षा अधिक अपेक्षा व्यक्त करतात. यातून लग्न जुळवण्याच्या मंगलविधीला बाजारू स्वरूप येते. हे चित्र बदलण्यासाठी लग्न व संसार हे मानवी जगण्याचा अविभाज्य अंग आहे, याचे महत्त्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे,’ असेही डॉ. कानिटकर यांनी सांगितले.
...
आजचे व्याख्यान
वक्ते ःअभिराम भडकमकर
विषयः भारतीय रंगभूमी व मराठी नाटक
वेळः सायंकाळी सहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.