कोल्हापूर

दालन माहितीपत्रक प्रकाशन

CD

बांधकाम प्रकल्पांना जलद मंजुरी देऊ
के. मंजुलक्ष्मीः क्रिडाईतर्फे ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान ‘दालन २०२४’ प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : ‘महापालिका नगररचना विभागात शंभर जागा भरण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच या जागा भरण्यात येतील. तूर्त बांधकाम प्रकल्पाना मंजुरी देण्याच्या कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. त्यासोबतच क्रिडाई संस्थेतर्फे भरवण्यात येणाऱ्या ‘दालन २०२४’ प्रदर्शनासाठी महापालिकेकडून आवश्यक ती मदत केली जाईल,’ असे आश्वासन महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिले.
क्रिडाईतर्फे ९ ते १२ फेब्रुवारी कालावधीत दालन २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शन भरणार आहे. महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन आयुक्त के. मंजुलक्ष्मी व पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले, ‘क्रिडाईने गेल्या ३५ वर्षांपासून कोल्हापुरात व्यवसायाबरोबर सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. महापुराच्या वेळी आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यापासून ते कोरोना काळात कोविड सेंटर उभारणी करण्यापर्यंतचे अनेक उपक्रम राबवले.या सोबत बांधकाम प्रकल्प राबवत येथील गरजू व्यक्तींच्या घराचे स्वप्नही साकारले आहे. महापालिकेकडून विविध बांधकाम प्रकल्पाना मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ऑॅनलाईन प्रक्रिया जलद करावी, अशी बांधकाम व्यावसायिकांची अपेक्षा आहे.’
जिल्हा पोलिसप्रमुख पंडित म्हणाले, ‘बांधकाम व्यवसायासाठी मोठे भांडवल लागते. त्याशिवाय रेरा कायद्यानुसार बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण करावे लागतात. इथपासून ते ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापर्यंत अनेक आव्हाने या व्यवसायात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांसाठी प्रबोधन शिबीरेही घ्यावीत, जेणेकरून ग्राहकांकडून गैरसमजातून होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.’
या वेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार स्वप्नील राबाडे, सहायक संचालक विनय झगडे, भूमि अभिलेख विभागाचे किरण माने यांच्यासह सचिन ओसवाल, अतुल पोवार, गणेश सावंत, संग्राम दळवी, श्रीधर कुलकर्णी, उदय नचिते, संदीप मिरजकर आदी उपस्थित होते.
...
‘क्राफ्टिंग होम्स शिपिंग टुमारोज’ संकल्पना
दालन समितीचे संयोजक चेतन वसा म्हणाले, ‘क्राफ्टिंग होम्स शिपिंग टुमारोज’ या संकल्पनेवर आधारित क्रिडाई तर्फे दालन २०२४ हे प्रदर्शन भरणार आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्रातील वित्त व साहित्य पुरवठादारांनी ६८ स्टॉल्सचे नोंदणी केली आहे. विविध मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या प्रदर्शनात होणार आहे. यातून ग्राहकांना बांधकामविषयक ज्ञानात भर पडणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT