लोगो ः बिग स्टोरी
---------
55217
ताग शेती करा, जमिनीचा पोत सुधारा
औद्योगिक उपयोगातून कमाई शक्य; स्थानिक रोजगारालाही मिळेल गती
लिड
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ताग शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व सामू स्थिर ठेवण्यासाठी तागाशिवाय पर्याय नाही. तागाचे औद्योगिक उपयोगही आहेत. यातून स्थानिक रोजगाराला गती येऊ शकते. एखादा व्यवसाय, उद्योग उभा राहू शकतो. तागासाठी आजही आपल्याला पश्चिम बंगालवर अवलंबून राहावे लागते. ते कमी करण्यासाठी तागाला जिल्ह्यातील शेतीमध्ये स्थान द्यावे लागेल.
-अमोल सावंत.
...
विविध क्षेत्रांत उपयोग
्किलतान, गोणीचे कापड, कापडाच्या पिशव्या, ताग कापड, सुतळी, दोर तयार करणे, गालिचे बनविणे, घरातील आसने, बिछायत, गाद्यांच्या खोळी तयार करता येतात. कांबळी, शिंपीकामातील अस्तर, पॅडिंगसाठी तागाच्या कापडाचे एक थर देऊन प्लायबोर्ड तयार करतात. जलाशय, कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याच्या प्रतिबंधासाठी ताग-डांबरापासून तयार केलेला जलनिरोधक कपडा, घरांचे छप्पर, पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी, तंबूसाठी नवार पट्ट्या, रणगाड्यांच्या जाळ्यांची झाकणे, घराच्या बांधकामातील सिमेंटला पडलेल्या भेगा बुजविणे, ताडपत्र्या बनविणे, जमीन-पाण्याखालून जाणाऱ्या केबलांचे वेष्टन तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. दोर, सुतळी, दोरापासून बनविलेल्या जाळ्या, विजेच्या तारांच्या वेष्टनात, चप्पलांचे तळ तयार करणे, ताग (वाख) काढून घेतल्यावर उरणाऱ्या काड्यांचा उपयोग जळणासाठी होतो. विविध क्षेत्रांत तागाचा उपयोग होतो.
लागवडीखालील प्रकार
तागाचे तीतापाट प्रकारातील फान्दूक, धालेश्वरी, फुलेश्वरी हे पूर्वापार स्थानिक प्रकार आहेत. काक्याबोम्बाई, डी-१५४, आर-८५, सी- २०६, सी-२१२, सी-३२१, सी-४१२, सी-९१८, ईसी-४१४२, ईसी-४१४३ हे सुधारित प्रकार असून मीठापाट प्रकारात देशी, टोस्सा, चिन्सुराग्रीन, आर-२६, ओ-६२०, ओ-६३२, ओ-७५३ हेसुद्धा सुधारित प्रकार आहेत.
सेंद्रिय खतासाठी तागापासून तयार केलेले हिरवळीचे खत सर्वोत्तम पर्याय ठरते. जमिनीतील सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी ताग पीक जमितीन गाडावे लागते. त्यातून जमिनीत सेंद्रिय पदार्थ, अन्नद्रव्यांत वाढ होते. सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीची कार्यक्षमता वाढते. तागाच्या पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये असलेले रायझोबियम जिवाणू हवेतील नायट्रोजन घेतात. यामुळे पिकांना नत्र मिळते. सतत ऊस लागवड, रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होऊन जमिनीचा पोत ढासळतो. पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनी क्षारयुक्त, कठीण बनतात. जमिनीत कोणत्याही पिकाची मुळे खोलवर जाण्यास अडथळे येतात. पिकांचे उत्पादन कमी होते. माती घट्ट झाल्याने मुळांच्या वाढीवर परिणाम होतो म्हणून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास तागाची मदत होते. तागाची पिके नत्र खताला चांगला पर्याय ठरतात. पाणी मुरण्याचा वेग वाढतो. धूप कमी होते. जमिनीत तागामुळे ह्युमस वाढते. त्यामुळे ९० टक्के पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नद्रव्यांची उपलब्धता, सेंद्रिय कर्बाच्या पातळीमुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढते.
...
कोट
पूर्व जिल्ह्यातील शेतकरी पिकांच्या दोन सऱ्यांमध्ये ताग उत्पादन घेत असत; पण तागाचे बियाणे महाग आहे. असे बियाणे पश्चिम बंगालमधून आणावे लागते. यासाठी वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. खेडेगावातील शेती संस्था, विविध संघांमार्फत या बियाण्यांचे वितरण पूर्वी करत असत. आता अशा संघांमध्येही ताग बियाणे उपलब्ध होत नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तागाची शेती घेणे बंद केले आहे.
-अरुण भिंगारदिवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी.
कोट
‘कऱ्हाड, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जे शेतकरी ऊस पीक घेतात, तेच लोक उसाच्या सरीमध्ये, बांधाच्या बाजूला ताग घेतात; मात्र जे शेतकरी ऊस पीक घेत नाहीत, ते अन्य पिकांमधील सरींमध्ये ताग घेत नाहीत. खरे तर तागांचे बियाणे सहज उपलब्ध होत नाही. सध्या तागाचे बियाणे ८० रुपये किलोने विकले जाते. बियाण्याचे दर कमी केले तर शेतकरी ते घेतील. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: शेतात प्लॉट करून बियाणे विकसित करावे.’
-डॉ. भरत रासकर.
कोट
आजरा, भुदरगड, गडहिंग्लज भागांत पूर्वी लोक ताग लावायचे. जेणे करून जनावरांना ताजा हिरवा चारा मिळत असे. तागाची धाटं कुसकरून सरीत टाकली जात असत. त्यातून तागाचं धाट कुजून उत्तम शेणखत तयार होत असे. आता मात्र ताग कुठं दिसत नाही. सधन शेतकरी मात्र आपल्या उसाच्या सरीत सुरवातीला लावण करतेवेळी तागाचं बियाणं टाकून ताग तयार करतात; पण तेही प्रमाण कमी दिसते.
-सौ. सिंधुताई जाधव, झुलपेवाडी (ता. आजरा).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.