अधिवेशनाच्या समारोप समारंभात आज (ता. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
कोल्हापूर : शिवसेनेच्या पहिल्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे (Shivsena Mahaadhiveshan) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आज येथे झाले. येथे राज्यात महायुतीला लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्यासाठी ‘मिशन ४८ सक्सेस’ करण्याचा ठराव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.
महासैनिक दरबार हॉल येथे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. राज्यातील शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि सुमारे दोन हजार निमंत्रित पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महासैनिक दरबार परिसर शिवमय झाला होता. प्रत्येकाच्या गळ्यात शिवसेनेचा स्कार्प होता. गटागटाने सर्वजण सेल्फी, फोटोशूट करीत होते.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अशा वेगवगेळ्या भागांतून कार्यकर्ते आले होते. अधिवेशनात केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाच प्रवेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात मंत्री, कार्यकर्त्यांनी केलेल्या ठरावावेळी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या अभिनंदनासह एकूण सहा ठराव झाले.
यामध्ये लोकसभेची निवडणूक (LokSabha Election) महायुतीतून आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या उभारणीत योगदान दिलेल्यांचा विसर पडू नये, म्हणून त्यांच्या नावे विविध पुरस्कार शिवसेना वर्धापन दिनामध्ये दिले जाणार असल्याचीही माहिती मंत्री उदय सामंत यांनी दुपारच्या सत्रात पत्रकारांना दिली.
अधिवेशनाच्या समारोप समारंभात आज (ता. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर उद्या सायंकाळी गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसेनेचे सचिव किरण पावसकर, शीतल म्हात्रे, आमदार किशोर पाटील आणि बालाजी कल्याणकर यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
- श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
- काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव
- समाजाभिमुख निर्णय, योजनांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव
- शिवसेनेला उभारी देणाऱ्या नेत्यांच्या नावे शिवसेना पुरस्कार देण्याचा ठराव
शिवसेना नेते दत्ताजी साळवी - उत्कृष्ट कामगार पुरस्कार
शिवसेना नेते सुधीर जोशी - उभरता उद्योजक पुरस्कार
प्रमोद नवलकर - उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
शिवसेना नेता दत्ता नलवडे - आदर्श शिवसैनिक पुरस्कार
दादा कोंडके - कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार
शिवसेना नेते वामनराव महाडिक - शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार
शिवसेना नेते शरद भाऊ आचार्य -उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.