बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ धडक मोर्चा काढला.
कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान (Balumama Temple Admapur) येथे झालेल्या गैरव्यवहाराची सीआयडी (CID) चौकशी करावी, या मागणीसाठी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था,’ हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला.
दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांच्या हातात ‘प्रशासक नेमणे म्हणजे मंदिर सरकारी करण्याची पहिली पायरी’, ‘मंदिराचे सरकारीकरण नको’, ‘दोषींना शिक्षा झालीच पाहिजे’ असे विविध मागण्यांचे फलक होते. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर (Kolhapur Collector Office) आल्यानंतर या ठिकाणी निदर्शने केली. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
आंदोलनात महाराष्ट्र मंदिर (Maharashtra Temple) महासंघाचे समन्वयक सुनील घनवट, ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष निखिल मोहिते-कुराडे, उपाध्यक्ष मानतेश नाईक, चंदूलाल शहा, बजरंग दलाचे पराग फडणीस, अक्षय ओतारी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे शरद माळी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.