कोल्हापूर

१९५२

CD

लोगो ः फ्लॅशबॅक
निवडणूक १९५२
-
फोटो ः 70393
-
पहिल्या निवडणुकीतच
अपक्ष उमेदवाराला दिले निवडून

कोल्हापूर ः देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीतच कोल्हापूरकरांनी अपक्ष उमेदवाराला निवडून देत वेगळी वाट पकडली. स्वातंत्र्यचळवळीचे धगधगते वातावरण ताजे असताना स्वातंत्र्यसैनिक असलेल्या कॉंग्रेसच्या रत्नाप्‍पाण्णा कुंभार यांना पराभूत करत अपक्ष उमेदवार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी कोल्हापूरचे पहिले खासदार होण्याचा इतिहास रचला.
- उदयसिंग पाटील

कोल्हापूरच्या सर्वसाधारण जागेसाठी स्वातंत्र्य चळवळीतील नेते रत्नाप्पाण्णा कुंभार यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे ॲड. वसंतराव बागल यांनी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे दुरंगी लढतीचे चिन्ह असताना बॅरिस्टर खर्डेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सरदार घराण्यातील खर्डेकर यांनी परदेशात शिक्षण घेतलेले. अशा उच्चशिक्षित खर्डेकर यांनी राजकारणातील सुरू केलेला प्रवास अनेकांना वेगळा वाटला. शैक्षणिक माणूस राजकारणात कसा वावरणार यावर चर्चा सुरू होती. कुंभार म्हणजे विजय असे मानले जात होते. त्यासाठी कॉंग्रेसची त्यांच्या मागे असलेली ताकद महत्त्वाची होती. त्यातून कुंभार यांच्याबाबत फारच सकारात्मक वातावरण होते. बॅरिस्टर खर्डेकर यांनीही प्रचाराला वेग दिला होता. कोट, पॅंट, बूट, टाय असा पेहराव तसेच त्यांचे इंग्रजीबरोबरच मराठीवरही प्रभूत्व होते. त्यांच्या पेहराव्यामुळे ते लोकांत मिसळतील का अशी शंका असायची. मात्र, ते सर्व घटकांपर्यंत पोहोचले.
तिसरे उमेदवार असलेले बागल यांच्यामागे माधवराव बागल होते. त्यांच्यामुळे कॉंग्रेसच्या मतात विभागणी झाली. त्यावेळी निवडणुकीसाठी असलेल्या मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत नव्हती. थेट उमेदवाराचे चिन्ह असलेले बॉक्‍सच मतदान केंद्रात असायचे. मतदाराने त्याला हव्या त्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकायची पद्धत होती. यातून बॅरिस्टर खर्डेकर यांनी दोन लाख २२ हजार ८६४ मते मिळवून कोल्हापूरचे पहिले खासदार होण्याचा मान मिळवला. रत्नाप्पा कुंभार यांना १ लाख ६३ हजार ४१९ व वसंतराव बागल यांना ६१ हजार १२८ मते मिळाली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोल्हापुरात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले.
पहिले खासदार असले तरी त्यांनी कोल्हापुरात शिक्षणासाठी भरपूर प्रयत्न केले होते. शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून कॉलेज काढले. गोपाल कृष्ण गोखले कॉलेज म्हणून ते आजही सुरू आहे. त्यातून त्यांनी तरुणांना महाविद्यालयीन शिक्षणाची वाट खुली करून दिली. ते शिवाजी विद्यापीठ स्थापनेच्या सल्लागार समितीचे सदस्यही होते.

चौकट
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव नाकारला
बॅरिस्टर खर्डेकर यांनी निवडणुकीनंतर लोकसभेत इंग्रजीतील भाषणाने मोठी छाप उमटवली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी ते विविध विषयांवर चर्चा करत. त्यातून त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. खर्डेकरांनी तो नम्रपणे नाकारला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT