देशावरचे भाजपचे (BJP) संकट थोपवायचे असेल तर सर्व समविचारी पक्षांनी, गटांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
कोल्हापूर : ‘माजी आमदार दिवंगत श्रीपतराव शिंदे (Shripatrao Shinde) आणि आम्ही नेहमीच एकत्रपणे काम केले आहे. देशावरचे भाजपचे (BJP) संकट थोपवायचे असेल तर सर्व समविचारी पक्षांनी, गटांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शिंदे गटाने आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेऊन वैचारिक वाटचाल निश्चित केली आहे. शिंदे कुटुंबाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्ही कधीच श्रीपतराव शिंदे यांची उणीव भासू देणार नाही’, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली.
गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी (Swati Kori) यांनी सतेज पाटील यांची भेट घेऊन सोबत काम करण्याची भूमिका जाहीर केली. त्यावेळी पाटील बोलत होते. या वेळी माजी आमदार मालोजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.’ याप्रसंगी अॅड. विकास खोराटे, अकबर मुल्ला, दत्तात्रय मगदूम, बंटी कोरी, हिंदूराव नवकुडकर, अर्जुन पाटील, श्रीरंग चौगले, सचिन शिंदे, प्रणव शिंदे, प्रियंका यादव, सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
‘कामगारांसह देशभरातील कोणताही घटक मोदी सरकारच्या (Modi Government) कारभारावर समाधानी नाही. कामगार आणि सर्वसामान्यांचे राज्य आणायचे असेल, तर हीच संधी आहे. मोदी विरोधातील ही लढाई संघटित होऊन लढूया’, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयात झालेल्या इंडिया आघाडी घटक पक्षातील कामगार संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.’
याप्रसंगी विजय देवणे, संजय पवार, अनिल लवेकर, सतीशचंद्र कांबळे, सदाशिव निकम, शिवाजी मगदूम, तानाजी तावडे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, भगवान पाटील, एस. बी. पाटील, चंद्रकांत यादव आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला कॉ. उदय नारकर, अतुल दिघे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सुभाष जाधव, विवेकानंद गोडसे, दिलीप पवार, सुवर्णा तळेकर आदी उपस्थित होते.
इचलकरंजी : एखाद्या उमेदवाराला केवळ शिवसेनेचाच पाठिंबा हवा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने त्या उमेदवाराच्या पाठीमागे का फरपटत जावे, असा सवाल इचलकरंजीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे उपस्थित केला. शिष्टमंडळात शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, सागर चाळके, सयाजी चव्हाण, महादेव गौड, संभाजी नाईक, प्रकाश मोरबाळे, उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, रविराज पाटील, रवी वासुदेव, नितीन जांभळे, संभाजी सुर्यवंशी, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.