सुशीला वेळेत नाश्ता घेऊन गेली नाही. यामुळे पती मारुती हाच राग मनात धरून सकाळी अकरापासूनच पत्नीला शिवीगाळ करीत होता.
नूल : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे उसाची लावण सुरू असलेल्या ठिकाणी वेळेत नाश्ता घेऊन आली नाही म्हणून पतीने मानेवर लोखंडी विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. सुशीला मारुती बेळाज (वय ५०) असे मृत महिलेचे (Woman) नाव आहे. पोलिसांनी तिचा पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. तो पसार झाला आहे. सोमवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत गडहिंग्लज पोलिसांनी (Gadhinglaj Police) दिलेली माहिती अशी : बेळाजची शेती नाही. त्याने नूलमधील एका शेतकऱ्याची भागाने दोन एकर शेती केली आहे. याच शेतात सोमवारी सकाळपासून मारुती मजुरांना घेऊन उसाची लावण करीत होता. त्यावेळी सुशीला वेळेत नाश्ता घेऊन गेली नाही. यामुळे पती मारुती हाच राग मनात धरून सकाळी अकरापासूनच पत्नीला शिवीगाळ करीत होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मारुतीचा मुलगा बसवराज याने जनावरांचे दूध काढले. त्यानंतर ते डेअरीला घालण्यासाठी भावाकडे देऊन तो पत्नी सुप्रियाला सोबत घेऊन देवदर्शनासाठी बाहेर गेला.
दरम्यान, रात्री सव्वाआठच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या चन्नाप्पा बेळाजने बसवराजला फोनवरून ही माहिती दिली. तो तत्काळ मोटारसायकलने घरी आला. त्यावेळी घरी सोप्यात सुशीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या उजव्या बाजूच्या मानेवर विळ्याचा वर्मी घाव बसला होता. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बसवराज बेळाज याने फिर्याद दिली. परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
मारुतीला दारूचे व्यसन आहे. सायंकाळी सुशीला टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्यावेळी दारू पिऊन आलेल्या मारुतीने पुन्हा नाश्त्याच्या मुद्द्यावरून भांडण काढले. त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यावेळी रागाच्या भरात त्याने सोप्यातील विळा घेऊन तिच्या मानेवर वार केले. ‘मी सुशीलाला संपविले आहे,’ असे आम्हाला सांगून मारुती मागच्या शेतातून पसार झाल्याचे त्याच्या भाऊबंदाने पोलिसांना सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.