हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा मला पाठिंबा मिळू नये, हे काही साखर कारखानदारांचे कारस्थान आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
कोल्हापूर : शेतकऱ्याची (Farmers) जमीन कोणाच्या बापाची नाही. ती कोण घेत असेल तर त्याला धडा शिकवू. जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना हिसका दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे दिला. दरम्यान, या महामार्गाविरोधात एक लाखाचा मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) विरोधी संघर्ष समितीतर्फे आयोजित शेतकरी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते. आमदार सतेज पाटील (Satej Patil), माजी आमदार संपतराव पवार-पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, समितीचे समन्वयक गिरिश फोंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर १० जूनला या मोर्चाची तारीख निश्चित करण्याचेही यावेळी ठरले. तसेच महामार्गाविरोधात ५ ते १५ एप्रिलपर्यंत दोन लाख सह्यांची मोहीम राबविणे, त्यानंतर १५ ते ३० एप्रिलपर्यंत आमदारांना निवेदन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सतेज पाटील म्हणाले, ‘कंत्राटदारांचे भले करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हा महामार्ग केला जात आहे. शेतकऱ्यांनी त्याला बळी न पडता एकजुटीने जमीन न देण्याची शपथ घ्या.’ परदेशी म्हणाले, ‘शक्तिपीठ विरोधात जेव्हा लढा तीव्र होईल, त्यावेळी त्यामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान होईल. पण, शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये.’
संजय घाटगे म्हणाले, ‘कंत्राटदारांकडून पैसे मिळणार म्हणून सरकार शेतकऱ्यांचे अस्तित्व नष्ट करायला निघाले आहे. पवार-पाटील म्हणाले, ‘लढ्यासाठी पाठीवर रपाटे बसले तरी चालतील, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही.’
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘देवांची नावे घेऊन शक्तिपीठ महामार्ग करण्याचा डाव खेळला जात आहे. त्याला विरोध करण्याची शपथ घेऊया.’ फोंडे, महादेव धनवडे, विक्रांत पाटील-किणीकर, अमरीश घाटगे, मच्छिंद्र मुगडे, सुधाकर पाटील, भगवान पाटील यांची भाषणे झाली. प्रसाद खोबरे, सम्राट मोरे, योगेश कुळवमोडे, जम्बू चौगुले, तानाजी भोसले, बाळासाहेब पाटील, शिवाजी कांबळे, सर्जेराव देसाई, बबलू वडणगेकर उपस्थित होते. अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा मला पाठिंबा मिळू नये, हे काही साखर कारखानदारांचे कारस्थान आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना केला. शक्तिपीठ महामार्गासाठी महाविकास आघाडीनेच पायघड्या घातल्या, अशी टीका ही त्यांनी केली.
राजर्षी शाहू स्मारक येथे ते बोलत होते. स्वाभिमानी व उद्धव ठाकरे गटाचा साखरपुडा झाला. पण, लग्न जमलं नाही ? या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याबाबत शेट्टी म्हणाले, आम्ही अशा पद्धतीने कोणाकडेही जात नाही. तसेच साखरपुडा करायचा प्रश्नच येत नाही. याचे उत्तर द्यावे. आम्हाला सल्ला देण्यापेक्षा स्वत:चं काय होतं ते बघावे ? जाईल तिथे लोक अडवत आहेत. तर मित्र पक्षाचेच लोक जवळ करायला तयार नाहीत, असा टोला शेट्टी यांनी धैर्यशील माने यांचे नाव न घेता लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.