कोल्हापूर

नूल-चंद्रज्योती पदयात्रा

CD

नूल येथे उद्या चंद्रज्योती पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ४ : नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सुरगीशवर मठाचे मठाधिपती लिंगैक्य उपाचार्य रत्न श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या ८६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ६) कर्नाटकातील कणगला या त्यांच्या जन्मस्थळापासून नूलच्या सुरगीश्वर मठातील समाधीस्थळापर्यंत श्री चंद्रज्योती पदयात्रेचे आयोजन केले आहे.
मठाधीश श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रज्योती पदयात्रा होईल. कणगला येथून पहाटे पाच वाजता पदयात्रेला प्रारंभ होऊन व्हनोळी, कोणकेरी, हसूरचंपू, हेबाळ, निलजीमार्गे नूल येथे दुपारी बारा वाजता श्री सुरगीश्वर मठात पदयात्रेची सांगता होईल. पदयात्रा समारोपप्रसंगी निडसोशी मठाचे जगद्‍गुरू पंचम श्री. शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात चनवीर शिवाचार्य स्वामी हिरेमठ (संपगाव), श्रीशांतवीरलिंग शिवाचार्य स्वामी (औसा), श्री सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी (खानापूर), श्री सिद्धेश्वर स्वामी (कारिमठ हत्तरकी), सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी (आडी), श्री संपादन स्वामी (चिकोडी), श्री प्रभूलिंगेश्वर शिवाचार्य स्वामी (हिटणी), श्री निजलिंग देवरू (निडसोशी), श्री महांत सिद्धेश्वर स्वामी (बेलबाग गडहिंग्लज), श्री भगवानगिरी महाराज (नूल), हृषिकेशआनंद स्वामी (दत्तवाड) असे बारा मठाधीश मार्गदर्शन करतील. यानिमित्त सायंकाळी कीर्तनकार भागवताचार्य रूपालीताई सवणे (परतूरकर) यांचा संगीताचा कार्यक्रम होईल. नूल पंचक्रोशीतील भाविकांनी पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधीश श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे.
...
चौकट...
‘चंद्रश्री’ पुरस्कार वितरण
या कार्यक्रमात मठाचे लिंगैक्य उपाचार्य रत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावे दिला जाणारा चंद्रश्री पुरस्कार डॉ. राजेंद्र हिरेमठ (बसर्गे) यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यासेवा रत्न पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा नडगदल्ली व समाजसेवा रत्न पुरस्काराबद्दल शिवाजी डोळे यांचाही सन्मान होईल.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT