कोल्हापूर

विद्यापीठातील ‘संख्याशास्त्र’च्या ३२ विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी

CD

‘संख्याशास्त्र’च्या ३२ विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी

वर्षभरामधील यश; शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील ३२ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये विविध सांख्यिकी पदावर यश मिळविले आहे. शासनाच्या विविध विभागांद्वारे यासाठी पदभरती करण्यात आली.
शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचानालयाद्वारे संशोधन अधिकारी पदासाठी आयोजित परीक्षेमध्ये सरिता वारके, नीलम पाटील यांची निवड झाली आहे. पृथ्वीराज झांबरे, निकेत जाधव यांची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे राष्ट्रीय पोषण संस्था- हैदराबाद व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान, पुणे येथे तांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. मुकुंद बाचनकर, सुवर्णा मळावे, सोनम लंगुटे, आदिनाथ पाटील, विशाखा पाटील हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दलाचे प्रमुख) कार्यालय येथे वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक म्हणून रुजू झाले आहेत.
विशाल झिटे, प्रतीक दामते, ओंकार पाटील, प्राजक्ता जाधव, माधुरी नाझरे, शुभांगी स्वामी, मेघना साळवे, आदिनाथ पाटील, दिपाली करणे, वैभव सुराशे, विक्रांत रास्ते, उत्कर्ष शेलार, सोनम साठे, सृष्टी मोरे, निकेत जाधव, स्वप्नाली पवार, शुभांगी शेंडगे, सोनम लंगुटे, सुवर्णा माळवे, किरण चोथे यांची सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांख्यिकी अन्वेषक म्हणून निवड झाली आहे. दादासाहेब गोडसे, शिल्पा पाटील, शाईन मुजावर, सुनील मोरे, ओंकार पाटील, शुभांगी पाटील, कृष्ण माळी, श्रुती ओतारी, अशोक भोसले हे विविध महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकपदी ते रुजू झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणारे आहे.
...
बहुतांशजण ग्रामीण भागातील
‘यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांना कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभागप्रमुख डॉ. एस. बी. महाडिक यांचे प्रोत्साहन लाभले. संख्याशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी, भारतीय रिझर्व बँक, भारतीय रेल्वे, अर्थ व सांख्यिकी संचनालय, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ इत्यादीद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जात असल्याचे डॉ. महाडिक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT