कोल्हापूर

प्रचाराचा धुरळा

CD

लोकसभेच्या प्रचारात, जेवणावळी जोरात
आचारसंहितेला बगल देत नियोजन : धार्मिक कार्यक्रम, जाऊळ, लग्नाच्या वाढदिवसांचे निमित्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असतानाच एकीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना कार्यकर्त्यांसह भागातील लोकांसाठी जेवणावळीही जोरात सुरू आहे. आचारसंहितेची बजावणी करणाऱ्या पथकाला चकवा देत सुरू असलेल्या जेवणावळीतील प्रचारात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच जाऊळ, लग्नाचा वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापून हा उद्योग सुरू आहे.
जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागांसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. नेत्यांचे दौरे, सभा, भागाभागांत निघणाऱ्या पदयात्रा, कोपरा सभांनी जिल्ह्याचा कानाकोपरा ढवळून निघाला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या रखरखत्या उन्हात स्पर्धेतील सर्वच उमेदवारांकडून प्रचाराचे रान उठवले जात आहे. १५-२० वर्षांपूर्वी या निवडणुका लागल्या कधी आणि झाल्या कधी हेही कळत नव्हते, पण आजच्या जमान्यात कानाकोपऱ्यात खुट्ट झालेली गोष्ट समाजमाध्यमांच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. त्यातून प्रत्येक घर या ना त्या कारणांनी या प्रचारासोबत जोडले गेल्याचे चित्र आहे.
निवडणूक लागल्यापासून आतापर्यंत प्रत्यक्ष प्रचारात राबणाऱ्या किंवा नियोजन करणाऱ्यांसाठी श्रमपरिहार म्हणून रात्रीच्या जेवणाची सोय केली जात होती. पण प्रचार जसजसा पुढे जाईल, त्याची जशी रंगत वाढेल आणि ईर्ष्या दिसून येईल तसे आता भागनिहाय जेवणावळीचे नियोजन केले जात आहे. ‘मिसळ पे चर्चा’ च्या माध्यमातून सकाळी नाष्टा तर रात्री भागातील प्रमुखांच्या बैठक असल्याचे सांगून ‘तांबडा-पांढरा’चे नियोजन सुरू आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासनाने आचारसंहिता भंग होते का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमली आहेत. या पथकांना चकवा देत अशा जेवणावळी सुरू आहेत. कारवाईचा बडगा नको म्हणून नसलेले जाऊळ, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांच्या पत्रिका काढून एक हजार ते १५०० पर्यंत लोकांच्या जेवणाची सोय अगदी मंगल कार्यालयात केली जात आहे. आचारसंहिता पथकाची चौकशी झालीच तर ही पत्रिका आणि संबंधितांना पुढे केले जात आहे. त्यामुळे आचारसंहिता पथकाचीही कारवाई करताना पंचाईत होत आहे.
...
आचाऱ्यांना सुगीचे दिवस
यानिमित्ताने भागाभांगातील आचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. संबंधित भागातील एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांला या जेवणावळीच्या नियोजनाची जबाबदारी दिली जाते, त्याच्याकडून आपल्या मर्जीतील आचाऱ्याला हे काम दिले जाते. जेवणाच्या साहित्यासह वाढपी, टेबल-खुर्चीसह हे काम मिळत असल्याने ऐन लग्न सराईत या निवडणुकीच्या कामांमुळे आचारीही खूश आहेत.
...
‘लक्ष्मी’ दर्शनाचे नियोजन
कधी नव्हे ते लोकसभेच्या निवडणुकीतही गेल्या काही वर्षांपासून ‘लक्ष्मी’ दर्शनाची प्रथा सुरू झाली आहे. यावर्षीही तालुक्याचे ठिकाण, मोठी गावे, शहरातील प्रभागनिहाय या ‘लक्ष्मी’ दर्शनाचे नियोजन सुरू आहे. जाहीर प्रचाराची सांगता पाच मे रोजी आहे, त्यानंतर या प्रकारांना ऊत येणार आहे. आपल्या माणसांपर्यंत ‘लक्ष्मी’ पोहचली पाहिजे याचेही कागदोपत्री नियोजन करण्यात आल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT