कोल्हापूर

जिल्हा बार असोसिएशन पदाधिकारी पदग्रहण

CD

फोटो 81117

कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्यासाठी कटिबद्ध
अॅड. सर्जेराव खोत : बार असोसिएशनच्‍या पदाधिकारी, संचालकांनी स्वीकारला पदभार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मुंबई उच्च न्यायालयाचे परिक्रमा खंडपीठ कोल्हापुरात सुरू होण्यासाठी सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकिलांचा ३८ वर्षे लढा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत याकडे राज्य शासनाने योग्य पद्धतीने लक्ष न दिल्याने प्रश्न प्रलंबित आहेत. सहाही जिल्ह्यांची मोट बांधून परिक्रमा खंडपीठ स्थापन करण्‍याचा लढा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी सांगितले.
जिल्हा बार असोसिएशनच्‍या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांसोबत अॅड. खोत यांनी गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला. न्याय संकुलातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात अॅड. खोत बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ञ, माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
अॅड. खोत म्हणाले, परिक्रमा खंडपीठाच्या स्थापनेसोबत पुण्यातील आयुक्तांची कामे कोल्हापुरात चालावित यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महसूल विभाग, उपसंचालक भूमी अभिलेख विभाग यांची कामे कोल्हापुरात चालण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी नेमणूक करावी, अशी मागणी करणार आहोत. ज्युनिअर वकिलांसाठी शिष्यवृत्ती स्वरूपात महिना पाच हजार रुपयांप्रमाणे स्टायपेंड सुरू करावी, या मागणीचाही पाठपुरावा करणार आहे.
अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापुरात परिक्रमा खंडपीठ स्थापनेबाबत माजी न्यायमूर्ती मोहित शहा यांचा अहवाल सकारात्मक होता. मात्र, तरीही कोल्हापूरला संघर्ष करावा लागत आहे. पुन्हा नव्याने हा लढा उभारण्यासाठी कामाला लागू. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, आर. एल. चव्हाण, रणजित गावडे, गिरीश खडके यांनीही मनोगत व्यक्त केले.
सरकारी वकील विवेक शुक्ल, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, धनंजय पठाडे, सुभाष पिसाळ, संपतराव पवार, पी. आर. पाटील, माजी अध्यक्ष प्रशांत देसाई, बार असोसिएशनचे नूतन उपाध्यक्ष उमेश माणगावे, निशिकांत पाटोळे, राजू ओतारी, करणकुमार पाटील, सरिता घोरपडे, सोनाली शेठ, स्‍नेहलता सावंत, श्रद्धा कुलकर्णी, चंद्रकांत कुरणे, सागर घोरपडे, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT